Health News
Health Newsesakal

Health News : मुलांनी बिछाना ओला करणे...

काही शालेय वयातली मुलांमध्ये बिछाना ओला करण्याची समस्या आढळते.

- श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण (sajagclinic@gmail.com)

बाळ (Baby) जेव्हा चालू बोलू लागते तेव्हा हळूहळू त्याला त्याच्या शौचाची, लघवीची जाणीव होते व ते लघवीवर नियंत्रण ठेवायला शिकते. तीन ते पाच वर्षांचे होईपर्यंत मूल लघवीवर नियंत्रण मिळवते. असे असले तरी काही शालेय वयातली मुलांमध्ये बिछाना ओला करण्याची समस्या आढळते. मुलांमध्ये मुलींपेक्षा ही समस्या जास्त प्रमाणात आढळते.

शारीरिक वाढीबरोबर मज्जासंस्था, स्नायूंवरचे नियंत्रण, शरीराचे भान वाढते. वैचारिक, मानसिक, सामाजिक, भावनिक वाढ जशी होते तसे लघवी व शौचावर नियंत्रण येऊ लागते. शौच व लघवीवर नियंत्रण ठेवण्याचे ट्रेनिंग २-३ वर्षांची मुले आत्मसात करतात. यासाठी पालकांचे व ज्येष्ठ कुटुंबीयांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. ज्या मुलांमध्ये सुरुवातीपासून लघवीवर नियंत्रण आलेच नाही अशांमध्ये काही मूलभूत शारीरिक कारण, बद्धकोष्ठता, जंतूसंसर्ग, अनुवंशिकता, मधुमेह (Diabetes), फिटचा आजार किंवा अपुरे ट्रेनिंग असण्याचा संभव असतो.

Health News
लहान मुलांच्या 'या' बाबी कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडवायला ठरतात कारणीभूत!

या मुलांना शल्य चिकित्सक, बालरोगतज्ज्ञला वेळीच दाखवणे इष्ट. ज्या मुलाने किमान एक वर्ष नियंत्रण मिळवले आहे व नंतर काही कारणास्तव नियंत्रण सुटले अशामध्ये मनोसामाजिक ताण असण्याची शक्यता जास्त असते. लहान भावंडाचे आगमन, दवाखान्यात उपचारासाठी अॅडमिट होणे, शाळेची सुरुवात अथवा शाळेत मोठे बदल, पारिवारिक ताण जसे घटस्फोट अथवा वाद, नवीन घर अशीही ताणाची कारणे असू शकतात. लघवीचे नियंत्रणाच्या समस्यांमध्ये ३ प्रकार आढळतात रात्रीचे नियंत्रण नसणे, दिवसाचे नियंत्रण नसणे व दोन्ही वेळचे नियंत्रण नसणे.

Health News
Health Tips : हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? 'या' कारणामुळे होते दातांभोवतीच्या हाडांची झीज

मनोसामाजिक समस्येचे निदान

मुलाचे वय किमान पाच वर्षे असणे जरूरी आहे. सात वर्षांखालील मुलांमध्ये महिन्यातून किमान दोनवेळा बिछाना ओला करणे तर सात वर्षांवरील मुलांमध्ये महिन्यातून किमान एकदा बिछाना ओला करणे. कुठल्याही गंभीर शारीरिक व्याधी, आकडी किंवा मज्जासंस्थेच्या समस्येचा अभाव तसेच इतर कुठल्याही वैद्यकीय समस्या जसे मधुमेहाचा अभाव. याचबरोबर इतर कुठल्याही मानसिक व्याधी एकत्र नसणे आणि समस्या किमान तीन महिने असणे. परिणाम बऱ्याच अंशी मुले पुढे-मागे यातून आपोआप बरे होतात. समस्या जर बराच काळ चालली तर मात्र त्याचा मुलांच्या भावनिक व सामाजिक जीवनावर परिणाम होतो, त्यांची स्वप्रतिमा मलिन होते, त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. तसेच या समस्येमुळे कौटुंबिक क्लेश वाढतात व मूल लाजवट बनत जाते, मुलांचे व्यवहार कौशल्य सामाजिक कौशल्य संकुचित राहते. उलटपक्षी समस्येचे निदान व उकल लवकर झाली तर योग्य मदतीमुळे लघवीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

उपाय/उपचार

उपायांमध्ये औषधे, वर्तणूक सुधार तसेच समुपदेशन महत्त्वाचे ठरते. सर्वप्रथम वर्तणूक सुधार सुचवल्या जातात. पालकांना टॉयलेट ट्रेनिंगचे महत्त्व पटवले जाते व मुलाला ते सुसह्य कसे होईल, त्याचा आत्मविश्वास राखून त्याची मदत कशी करता येईल हे दाखवले जाते. यासाठी पालकांचे व मुलांचे समुपदेशन खूप महत्त्वाचे ठरते. डायरी लिहिणे, स्टार चार्ट बनवणे, दिवसा मुबलक पाणी पिणे, वेळीच लघवीला जाणे, मुलाला झोपायच्या आधी लघवी करण्यास प्रोत्साहन देणे, रात्री झोपायच्या अगोदर पाण्याचे प्रमाण कमी करणे, रात्री झोपेत उठून लघवीला घेऊन जाणे, मलावरोध असल्यास त्याचा उपाय करणे, जेवणामध्ये पालेभाज्या व फायबर वाढवणे, बेलपॅडच्या साहाय्याने लघवी होण्याच्या अगोदर मुलाला जाग येणे अशा विविध उपायांचा आधार घेतला जातो.

Health News
Diabetes Symptoms : सावधान..! लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह; वेळीच दक्षता न घेतल्यास आयुष्यभर राहणार धोका

काही मुलांमध्ये औषधांचा वापर करणे आवश्यक होते व डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर देखरेख ठेवली जाते. ज्या मुलांमध्ये इतर भावनिक समस्या आढळतात त्यांना योग्य ते निदान व उपाय करून त्यांचे मानसिक संतुलन सुधारण्यासाठी मानसतज्ञ अथवा मानसोपचारतज्ज्ञ उपाय सुचवतात. कौटुंबिक क्लेश असल्यास कुटुंबाला समुपदेशन व भावनिक आधार देण्यात येतो. ज्यांना मनोसामाजिक कारणामुळे लघवीवरचे नियंत्रण सुटते त्यांना वरील उपायांचा चांगला परिणाम संभवतो. समस्येची उकल झाल्यावर मुलाचा आत्मविश्वास वाढतो व त्याची भावनिक व सामाजिक वाढ निकोप होते.

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com