Children
Childrenesakal

'ऑटिझम' हा मज्जासंस्थेचा आजार असला, तरी आजतागयत त्याच्यावर कुठलेही ठोस औषध नाही!

बाळ एक-दीड वर्षाचे झाले, चालायला बोलायला लागले की ते माणसे ओळखू लागते, नाती समजू लागते.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

बाळ एक-दीड वर्षाचे झाले, चालायला बोलायला लागले की ते माणसे ओळखू लागते, नाती समजू लागते. थोडक्यात त्याचे सामाजिकीकरण सुरू होते, परंतु काही मुलांमध्ये स्वमग्नता किंवा ऑटिझम (Autism) या मेंदूतील बिघाडामुळे समाजामध्ये मिसळायला, नाती प्रस्थापित करायला त्रास होतो. स्वमग्नता किंवा ऑटिझम हा मज्जा संस्थेचा किंवा मेंदूतला विकार आहे.

Children
Konkan Business : कोकणात उद्योगधंदे बंद-आजारी का पडतात?

ज्याच्यामध्ये मेंदूचे पेशींच्या जोडणीमध्ये अवरोध किंवा चुकीच्या जोडणीमुळे स्वभावदोष निर्माण होतो. भावनिक जडणघडणीत बाधा निर्माण झाल्यामुळे मुलाला भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला कठीण जाते. मुलांमध्ये पराकोटीचा एककल्लीपणा दिसून येतो. मुलाला रुटीनमध्ये झालेला बदल अजिबात मान्य नसतो व तसे झाल्यास ते खूप दंगा करते.

अलीकडच्या काळात बर्फी सिनेमामधील प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) वठवलेली भूमिका आठवली तर स्वमग्नतेचा थोडा अंदाज येईल. या मुलांमध्ये प्रीटेंडप्ले किंवा नक्कल करणे, कल्पनेमध्ये रमणे जमत नाही. संपूर्ण खेळण्याशी खेळण्यापेक्षा खेळण्याच्या एखाद्या भागाशीच ते जास्त खेळताना आढळतात. हातापायाच्या चमत्कारिक हालचाली करतात जसे जागच्याजागी उड्या मारणे, हात पंखासारखे उडवणे, गोल गिरकी घेत राहणे इत्यादी.

Children
Health Tips : हिरड्यांचा आजार म्हणजे नक्की काय? 'या' कारणामुळे होते दातांभोवतीच्या हाडांची झीज

कधी ते स्वतःच्याच हाताचा चावा घेतात किंवा डोके आपटतात किंवा गोल-गोल गरगर फिरत राहतात. कधी त्यांना स्पर्श केलेला आवडत नाही, जवळ घेतलेले आवडत नाही व चालतानाही जमिनीचा स्पर्श होऊ नये म्हणून ते चवड्यावर चालतात. कधी काही आवाजांना जसे कुकर किंवा पंख्याच्या आवाजाला ते खूप घाबरतात. अशा मुलांना संभाषण करण्याची उर्मी नसते. भूक लागली तरी ते न सांगू शकल्यामुळे भूक तहान तशीच सहन करीत राहतात.

ऑटिझमची प्रमुख लक्षणे म्हणजे

  • स्वमग्नता- इतरांच्या अस्तित्वाबद्दल उदासीनता. एकांतप्रिय असणे, भोवतालच्या परिस्थितीचे किंवा धोक्याचे भान नसणे

  • बोलण्यातील दोष- संवाद साधता न येणे, विचित्र प्रकाराने संवाद साधणे

  • विचित्र हालचाली किंवा त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करीत राहणे, बदल स्वीकारता न येणे

  • कुतूहल किंवा जिज्ञासा नसणे, भावना ओळखता न येणे

Children
Konkan Tourism : कोकणात पर्यटनाचा खजिना; रोजगार-व्यवसायाला मोठ्या संधी

कारण

स्वमग्नता हा वाढीच्या वयात होणारा मेंदूचा आजार आहे. पूर्वी दहा हजारात एक मुलाला असलेला हा आजार हल्ली शंभरात एक एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पहिल्या दोन वर्षात जेव्हा मेंदूच्या पेशी जोडल्या जात असतात. तेव्हा मेंदू अतिशय लवचिक असतो. मेंदूच्या पेशींची वायरिंग जोडणी जर या काळात चुकली तर दुष्परिणाम दुरगामी ठरतात. काही प्रमाणात हा आजार अनुवंशिक असू शकतो, जनुकांशी निगडित असू शकतो. बदलत्या जीवनमानामुळे व जीवनशैलीमुळे, प्रदूषणामुळे, मेंदूवर सूज आणणारे जंतू संसर्ग याचे वाढत्या प्रमाणाचे कारण असू शकते.

निदान

दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जर आई वडिलांना आढळले की मूल बोलत नाही, नजरेला नजर भिडवत नाही, नावाला ओ देत नाही, विचित्र हावभाव करीत आहे आणि त्याचे श्रवण चांगले आहे, तर ही लक्षणे स्वमग्नतेची असू शकतात. वेळीच बालरोग तज्ञ, बाल मनोविकार तज्ज्ञ, मनसोपचारतज्ज्ञला अथवा वाचा विशेषतज्ञ यांची मदत घ्यावी. दोन ते अडीच वर्षांच्या आत निदान व उपाय सुरू होणे गरजेचे असते जेणे करून त्याच्या सामाजिक वाढीमध्ये व्यत्यय टाळता येईल व पुनर्वसन सोपे होईल.

Children
सरकारचा विरोध असतानाही सीमाभागातील 865 गावांना मिळणार महाराष्ट्राच्या 'या' योजनेचा लाभ; कसं ते जाणून घ्या..

उपचार

ऑटिझम हा मज्जासंस्थेचा आजार असला तरी आजतागयत त्याच्यावर कुठलेही ठोस औषध नाही. उपचारांमध्ये ऑक्युपेशन थेरेपी व स्पीच थेरपीचा महत्त्वाचा भाग असतो. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये अतिसंवेदनशीलता किंवा संवेदनहीनता या दोन्हीवर उपाय केले जातात. त्यांना जीवनपयोगी कौशल्य विकासासाठी मदत केली जाते जेणे करून ते मूल स्वावलंबी बनू शकेल. पालकांनाही या थेरपी मध्ये सामील करून घेतले जाते जेणे करून मुलाला त्याच्या कोशातून सातत्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच स्पीच थेरेपी मध्ये मुलाला नजरेला नजर देऊन बोलायला प्रोत्साहन दिले जाते. संवादासाठी भाषा हावभावातून, चित्रातून व संभाषणातून वाढवत नेली जाते. स्वमग्नता मुलांच्या वाढीतील एक विचित्र समस्या आहे ज्याबद्दल अजूनही हवी तेवढी जागृती समाजात नाही. योग्य निदान व वेळीच मदत न मिळाल्यामुळे मुलाबरोबर पालकांनाही खूप मनस्ताप भोगावा लागतो. या विषयी अजून प्रबोधन होणे गरजेचे आहे.

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com