Anuja Salvi Ratnagiri ACB Office
Anuja Salvi Ratnagiri ACB Officeesakal

आमदार साळवींच्या पत्नीची तब्बल 5 तास चौकशी; आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्याने अनुजा साळवींना अश्रू अनावर

अनुजा साळवी यांच्याविरोधात रत्नागिरी एसीबी कार्यालयाने साडेतीन कोटी अपसंपदेचा गुन्हा दाखल केला होता.
Summary

एसीबी कार्यालयातील आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्याने राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांना अश्रू अनावर झाले.

रत्नागिरी : साडेतीन कोटींच्या अपसंपदेच्या गुन्ह्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पत्नी अनुजा साळवी (Anuja Salvi) यांची एसीबी कार्यालयात ५ तास चौकशी करण्यात आली.

कालपासून शुक्रवारपर्यंत दररोज ५ तास चौकशीला हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे (High Court) असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजन साळवी यांच्या पत्नीची आज व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात ५ तास चौकशी झाली. त्यांच्याविरोधात रत्नागिरी एसीबी कार्यालयाने साडेतीन कोटी अपसंपदेचा गुन्हा दाखल केला होता.

Anuja Salvi Ratnagiri ACB Office
Ramdas Athawale : रिपब्लिकन ऐक्यासाठी रामदास आठवले सत्तेतून बाहेर पडणार; डॉ. गवईंचा मोठा गौप्यस्फोट

या गुन्ह्यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेने त्यांनी न्यायालयात अटकपूर्वी जामिन अर्ज केला होता. परंतु तो न्यायालाने फेटाळला. याविरोधात साळवी उच्च न्यायालयात गेले. तेथे त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. परंतु रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची अट घातली आहे. त्यानुसार आज दुपारी १ ते ५ अनुजा साळवी यांची चौकशी झाली. शुक्रवारपर्यंत दररोज १ ते ५ अशी साळवी यांची चौकशी होणार आहे.

Anuja Salvi Ratnagiri ACB Office
उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला, तेव्हा मद्यपान करून गद्दारांची औलाद..; काय म्हणाले राऊत?

अन् अश्रू अनावर

चौकशीनंतर राजन साळवी यांच्या पत्नी भावूक झाल्या. एका सर्वसामन्य गुन्हेगारांप्रमाणो एसीबी कार्यालयातील आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्याने राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांना अश्रू अनावर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com