Konkan Hapus Mango
Konkan Hapus Mangoesakal

Alphonso Mango : वाशी बाजारात हापूस आंब्याच्या तब्बल 55 हजार पेट्या दाखल; बागायतदारांचा थेट विक्रीवर भर

१ एप्रिलला ६४ हजार पेटी आंबा बाजारात दाखल झाल्याचे वाशी बाजार समितीमधून सांगण्यात आले.
Summary

दर चांगला मिळत असल्यामुळे काही बागायतदारांकडून कमी दर्जाची किंवा कोवळी फळं पाठवल्याचे प्रकारही पुढे आले आहेत.

रत्नागिरी : उन्हाचा कडाका वाढल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला वाशी मार्केटमधील हापूस आंब्याची (Konkan Hapus Mango) आवक वाढली आहे. सलग चार दिवस ५० ते ५५ हजार पेटी दाखल होत होती. आवक वाढल्यामुळे दर दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

हवामान विभागाच्या (Meteorology Department) अंदाजानुसार, यंदा उष्मा अधिक जाणवत आहे. तापमानाचा पारा ३७ अंशापर्यंत वर गेला होता. त्यामुळे झाडावरील फळं वेगाने तयार होत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाच डझन पेटीचा दर साडेचार हजार रुपयांपर्यंत होता. तो पुढे कमी होत गेला. २६ मार्चला कोकणातून ३६ हजार पेटी आंबा वाशीत दाखल झाला होता. त्यानंतर २७ ला त्यात मोठी वाढ झाली.

Konkan Hapus Mango
Koyna Dam : 'सांगली पाटबंधारे'कडून मागणी होताच कोयना धरणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला

५४ हजार ५७ पेट्या कोकणातून पाठवण्यात आल्या होत्या. सलग चार दिवस त्या टप्प्यातच पेट्या जात होत्या. १ एप्रिलला ६४ हजार पेटी आंबा बाजारात दाखल झाल्याचे वाशी बाजार समितीमधून सांगण्यात आले. त्यानंतर २ एप्रिलला ४२ हजार, ३ ला ३८ हजार आणि ४ ला ४२ हजार पेटी दाखल झाल्या आहेत. यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात कधी नव्हे एवढी आवक बाजारात होती.

सुरवातीला दर अधिक असल्यामुळे ग्राहकांकडून मागणीही कमी असते. निर्यातही सुरू झालेली नसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आल्याने त्याचा दरावर परिणाम होतो, असे वाशीतील व्यावसायिकांचे मत आहे. पहिल्या बहरातील आंबा संपुष्टात आला असून, आता १० ते १५ एप्रिलपर्यंत पेटींची संख्या कमी राहील, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तवला जात आहे. दर चांगला मिळत असल्यामुळे काही बागायतदारांकडून कमी दर्जाची किंवा कोवळी फळं पाठवल्याचे प्रकारही पुढे आले होते. हा टक्का अधिक राहिल्यामुळे त्याचा परिणाम दरावर होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Konkan Hapus Mango
मिरजेत होणार नवे कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन; तिरुपती, धनबादसह सोलापूरकडं धावणाऱ्या गाड्यांची 30 मिनिटं वाचणार

थ्रीप्सने थैमान

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहोराला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. त्याच्यानंतर डिसेंबरअखेरीस थोड्याफार प्रमाणात मोहोर आला होता. नंतर जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्‍या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता; परंतु, या मोहोरावर थ्रीप्सने थैमान घातले होते. त्यामुळे या वर्षीच्या उत्पादनावर लगाम लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com