konkan news
konkan newssakal

Konkan News: उसळलेल्या समुद्रात उलटली बोट... वाचा पुढे काय झाले

Konkan News: वेगवान वारे आणि समुद्रातील उसळलेल्या लाटांमुळे रत्नागिरीतील समुद्रात एक मच्छीमार नौका उलटली. सुदैवाने, त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नौकेचे मात्र नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे रत्नागिरीतील बहुसंख्य मच्छीमार नौका मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नाहीत.(boot fall in arebian sea)

konkan news
Konkan News : आदरणीय उत्सवबाळू - अण्णा छत्रे

रत्नागिरी समुद्रात सुमारे १२ नॉटिकल मैल अंतराबाहेर बाळा मेस्त्री यांच्या मालकीची नौका संध्याकाळच्या वेळी मासेमारी करत होती. सध्या समुद्रात जोरदार वारा सुटला आहे. या वाऱ्यामुळे समुद्रात लाटा उसळलेल्या असल्याने लाटांच्या तडाख्याने मच्छीमार नौका उलटली. आजुबाजूला मासेमारी करणाऱ्या इतर नौकांनी खलाशी आणि तांडेलना सुखरूप किनाऱ्यावर आणले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत उलटलेली बोट सरळ करून बंदरावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

konkan news
Konkan News : 'सांबराची किंकाळी ऐकू आली अन् आमची हालचाल कमी झाली'

नौका किनाऱ्यावर आली नसल्याने मत्स्यव्यवसाय विभागाकडे नुकसानीची माहिती उपलब्ध झाली नाही. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. सुमारे २ हजार ५२० मच्छीमार नौका या समुद्रात मासेमारी करतात. गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य नौकांना मासळीचा रिपोर्ट मिळालेला नाही.

खर्चाइतकीही मासळी मिळालेली नाही. सुमारे ४६ कोटी रुपयांचे डिझेल परताव्याचे अनुदान मिळाल्याने काही मच्छीमार नौकामालकांचे नुकसान डोक्यावरून खांद्यावर आले तर समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने आणि चांदण्यामुळे मासळी मिळत नसल्याने बहुसंख्य नौका मिरकरवाडा बंदरात उभ्या आहेत.

konkan news
Konkan News : नानाचं औषध : जालीम पण नाजूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com