देवरुखात कोरोनाशी दोन हात ; लोकं सातच्या आत घरात...

प्रमोद हर्डीकर
रविवार, 22 मार्च 2020

देवरुख शहर आणि संगमेश्वर तालुका इतिहासात पहिल्यांदा असा शांत राहीलेला सर्वांनी अनुभवला.देवरुख शहरातील नागरीकांनी सातच्या आत घरात राहून बाहेर पडणे पसंद न केल्याने शहरात चांगल्या गोष्टीसाठी सन्नाटा पसरला.

साडवली (रत्नागिरी) कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेलाच दोन हात करुन कोरोनाचा मुकाबला करा असे आवाहन करुन जनतेने आपल्यासाठीच कर्फ्यु करावा अशी साद घातली होती याला जनतेने प्रतिसाद देवून रविवारी हा कर्फ्यु यशस्वी करुन दाखवला.

देवरुख शहर आणि संगमेश्वर तालुका इतिहासात पहिल्यांदा असा शांत राहीलेला सर्वांनी अनुभवला.देवरुख शहरातील नागरीकांनी सातच्या आत घरात राहून बाहेर पडणे पसंद न केल्याने शहरात चांगल्या गोष्टीसाठी सन्नाटा पसरला.

हेही वाचा-Photo : जगात भारी आम्ही कोल्हापुरी... जनता‌ कर्फ्यूला सन्नाटा...

देवरुख शहरात शुकशुकाट
देवरुख तहसीलदार,पंचायत समिती,आरोग्य विभाग,रिक्षा संघटना,एस.टी,आगार,पोलीस यंञणा यांनी यात सहभागी होत कोरोनाशी मुकाबला करण्याचे बळ दिले.शहरातील व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळला.देवरुख एस.टी.आगारातुन दररोज ६९४ फेर्‍या सुटतात.या सर्व फेर्‍या रद्द केल्यामुळे प्रवाशी आलेच नाहीत व कर्फ्यु यशस्वी झाला.रेल्वे,खाजगी आराम बस यांनीही बंद पुकारल्यामुळे नागकांना प्रवासही करता येणार नव्हता.यामुळे नागरीकांनी देशहितासाठी,स्वतःच्या आरोग्यासाठी व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रविवारचा कर्फ्यु यशस्वी केला.

हेही वाचा- Janta carfew : भावा कुठे निघालास? काय काम आहे तुझे...?

नागरीकांनी केले सहकार्य

शहरात महसुल विभागाचे,आरोग्यविभागाचे व पोलीस यंञणा कार्यान्वित होती.त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.एरव्ही रविवार हा देवरुखचा बाजाराचा दिवस माञ इतिहासात आज पहिल्यांदाच देवरुख शहरात शांततेचा माहोल नागरीकांनी अनुभवला.रिक्षा संघटनांनी एकजुट दाखवून जनतेच्या कर्फ्युत सहभागी होवून सहकार्य केले.एस.टी.आगाराने संपुर्ण वाहतुक बंद ठेवून या लढ्याला पाठींबा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hands with coronas fight People in the house within seven kokan marathi news