Vidhan Sabha 2019 : ब्रिगेडिअर सुधीर सावंतांचे हे आहे मिशन

कणकवली - येथील पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडिअर सुधीर सावंत
कणकवली - येथील पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडिअर सुधीर सावंत

कणकवली - कोणत्याही परिस्थितीत कणकवलीतून सतीश सावंत निवडून यायला हवेत. राजकीय दहशतवादाविरोधात ही आमची शेवटची लढाई आहे. मागील वेळेस वैभव नाईक यांना विजयी करून तेथील दहशतवाद मोडीत काढला. तर आता सतीश सावंत यांच्या विजयाचे मिशन घेऊन आम्ही काम करतोय, अशी माहिती ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आज येथे दिली.

माजी आमदार विजय सावंत यांच्या संपर्क कार्यालयात ब्रिगेडिअर सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती; मात्र आज ते शिवसेनेच्या प्रचारात उतरले. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवेशाचाही इन्कार केला. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, दादा सावंत, सुनील सावंत, विलास कोरगावकर आदी उपस्थित होते.

बिग्रेडिअर सावंत म्हणाले, ""आमच्या मिशनमध्ये सर्वच पक्षातील लोक आहेत. सह्याद्रीपट्ट्‌यातील अनेक गावातून हजारो मुंबईकर चाकरमानी कणकवली मतदारसंघात आले आहेत. इथल्या सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही दहशतवाद विरोधातील शेवटची लढाई आम्ही सर्वजण लढतोय आणि यात आम्ही निश्‍चितपणे यशस्वी होऊ.''

ते म्हणाले, ""आम्ही कणकवली मतदारसंघावर पूर्ण फोकस केला आहे. हा सिंधुदुर्गच्या राजकारणातील निर्णायक लढा आहे. खरं तर सावंतवाडी मतदारसंघात जाऊन आम्हाला दीपक केसरकर यांचाही प्रचार करायचा होता. तेथे माजी सैनिकांचीही मोठी संख्या आहे; पण कणकवलीत खरी दहशतवादाविरोधातील लढाई आहे. त्यासाठी आम्ही सर्व पक्षातील मंडळी पक्षभेद विसरून एकत्र आलो आहोत.''

मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही
मी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच कॉंग्रेस पक्ष प्रवेशाबाबतची बोलणीही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच इतर कुठलेही पद माझ्याकडे असण्याचा प्रश्‍नच येत नाही असा खुलासा ब्रिगेडिअर सावंत यांनी येथे केला. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मल्लीकार्जून खरगे व इतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी आपण दिल्ली येथे चर्चा केली होती. कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत आपण औपचारिक बैठक देखील घेतली; पण कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आपली चर्चा झाली नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात प्रवेशाचा मुद्दा चर्चेला आला नाही. आपण यापूर्वी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी म्हणून काम केलंय. त्यामुळे जिल्हाध्यक्ष वगैरे पदांवर मी असूच शकत नाही. तसेच आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व अफवा असल्याचेही श्री.सावंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com