Rajapur Dam : राजापुरातील नव्या धरणाचे काम रखडले; धरण पूर्ण करण्यासाठी अद्याप 'इतक्या' कोटींची गरज

गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरवासीयांना भेडसावत असलेली एप्रिल-मेमधील पाणीटंचाईची (Water Shortage) समस्या यावर्षीही कायम आहे.
Rajapur Dam
Rajapur Dam esakal
Summary

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जुन्या धरणाच्या (Dam) खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. या धरणाच्या कामासाठी १० कोटीचा निधी मंजूर झाला होता.

राजापूर : गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरवासीयांना भेडसावत असलेली एप्रिल-मेमधील पाणीटंचाईची (Water Shortage) समस्या यावर्षीही कायम आहे. भविष्यामध्ये पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी सायबाच्या धरणाच्या येथे नव्याने बांधण्यात येणारे धरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या धरणाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, अद्यापही वीस टक्के काम निधीअभावी शिल्लक आहे. त्यामध्ये सतरा गेट वा गाळ्यांसह अन्य स्वरूपाच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे सात कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कोदवली येथील सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षापासून शहराचा मुख्य जलस्रोत आहे. या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने शहराला दरवर्षी एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

Rajapur Dam
Chikkodi Lok Sabha : मतदारसंघातील 650 हून अधिक गावांत प्रचार केल्यानंतर जोल्ले, जारकीहोळी झाले 'रिलॅक्स'

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जुन्या धरणाच्या (Dam) खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. या धरणाच्या कामासाठी १० कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम निधीअभावी रखडले आहे. रखडलेल्या कामांमध्ये सतरा झडपे वा गाळ्यासह जोडरस्ता, वीजेची सुविधा यांसह अन्य स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे. धरणाच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी येथील पालिकेने शासनाकडे केली आहे.

Rajapur Dam
Sheel Dam : रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात फक्त 25 टक्केच पाणी; पानवल धरणही गळतीमुळे बंद!

दृष्टिक्षेपात जुने धरण

  • बांधकाम १८७८

  • बांधकामाचे स्वरूप दगडी बांधकाम

  • धरणाची लांबी ३० मीटर

  • उंची ४.५० मीटर

  • माथा रुंदी ३.०० मीटर

  • पाण्याची पाईपलाईन ८ इंच

दृष्टिक्षेपात सायबाचे नवीन धरण

  • लांबी ५० मीटर

  • उंची ६.४८ मीटर

  • भिंत रुंदी १० मीटर

  • झडपे वा गाळे १७

  • माथा उंची ९७ मीटर

  • अंदाजपत्रक सुमारे दहा कोटी रुपये

  • संभाव्य पाणीसाठा १०३ सहस्त्र घनमीटर

  • पाण्याची पाईपलाईन १४ इंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com