Kokan : निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आली
Kho-Kho
Kho-Khosakal

रत्नागिरी : ३७ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आलेरत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आलेआहे. या स्पर्धेसाठी राज्यातील ४८ संघ आणि जवळपास नऊशेहून अधिक खेळाडू, पदाधिकारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेची जोरदार तयारी रत्नागिरीत जिल्हा खो-खो असोसिएशनकडून सुरू झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खोखोची तीन मैदाने तयार केली जात आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण ऊर्फ भय्याशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत. भय्याशेठ सामंत यांच्या पाठबळामुळे या स्पर्धेचे शिवधनुष्य पेलण्यास पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

आमदार योगेश कदम, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम यांच्यासह अनेक संस्थांचे पाठबळ या स्पर्धेला मिळत आहे. रत्नागिरीत नऊशेहून अधिक खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक व संघटनेचे पदाधिकारी दाखल होणार असून, रत्नागिरीकरांना खो-खोच्या वेगवान खेळाची मजा लुटता येणार आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे, जिल्हाध्यक्ष बाळू साळवी, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, राजेश कळंबटे, राजेंद्र चव्हाण, राजेश चव्हाण, सूरज आयरे, प्रशांत कवळे, सचिन लिंगायत, प्रसाद सावंत, सूरज आयरे, सैफन चरके आदी यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर खऱ्या अर्थाने मैदानी खेळांना चालना मिळाली असून विविध स्पर्धाही उत्साही वातावरणात पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार व आरती कांबळे

या दोन खेळाडूंनी आपल्या २ खेळाचा ठसा उमटविला आहे. रत्नागिरीत खो-खोमध्ये अनेक खेळाडू तयार होत असून, या स्पर्धेमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com