कझाकस्तानमध्ये नाशिकच्या 19 जणांनी पटकावला आयर्नमॅन किताब

खडतर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगभरात अनेक ठिकाणी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा आयोजित केली जाते.
Iron Man
Iron Manesakal

नाशिक : कझाकस्तानमध्ये पार पडलेल्या ‘आयर्नमॅन’ किताब नाशिकच्या १९ जणांनी पटकावला आहे. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी सलग तीन वेळेस आयर्नमॅन स्पर्धा जिंकत हॅटट्रिक साधली. तसेच, आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस अश्‍विनी देवरे यांचाही समावेश असून, बहुधा त्या महाराष्ट्र पोलिस दलातील आयर्नमॅन किताब पटकाविणाऱ्या पहिल्याच महिला पोलिस कर्मचारी असाव्यात. (Latest Marathi News)

Iron Man
जळगावच्या सुपुत्राने फडकविला ‘एल्ब्रुस’वर तिरंगा

स्वीमिंग, सायकलिंग आणि धावणे, अशी ही खडतर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगभरात अनेक ठिकाणी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा आयोजित केली जाते. कझाकस्तानात आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेसाठी नाशिकमधील १९ जणांनी सहभाग घेतला होता. एक दोन नव्हे तर सर्वच स्पर्धकांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत एकप्रकारे विक्रमच साधला आहे. विशेषत: नाशिकच्या तीन खेळाडूंनी हा आयर्नमॅन किताब पटकावतानाच, या किताबाची हॅटट्रिकच साधली आहे. यापूर्वी प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले या खेळाडूंनी दोन आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. ३.८ किमी स्वीमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

Iron Man
नाशिक : पिता आणि पुत्र एकाचवेळी बनले आयर्नमॅन!

हे ठरले ‘आयर्नमॅन’
डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाळे, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झंवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, नीलेश झंवर, नीता नारंग, आविष्कार गचाळे, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरिया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार.

पितापुत्रांचे कौतुक
नाशिकचे डॉ. अरुण गचाळे यांनी त्यांच्या १७ वर्षीय मुलगा आविष्कार समवेतच या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या दोघांनी स्पर्धेत साहसी कामगिरी करीत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. आयर्नमॅनसारखी खडतर स्पर्धा पूर्ण करणारे हे पहिलेच पितापुत्र ठरले आहेत.

Iron Man
पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबांचा 20 किलोमीटर पायी प्रवास

''ऑलिम्पिकमध्येही ट्रायथलॉनचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच नाशिकमध्ये ट्रायथलॉन अकादमी सुरु करणार आहोत. जेणेकरून आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल. अल्ट्रामॅन स्पर्धा हे पुढील लक्ष असून, त्यासाठी तयारी सुरू केली आहे.'' - महेंद्र छोरिया, आयर्नमॅन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com