SA vs SL CWC2023 : माक्ररमने 12 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडलं... आफ्रिकेने देखील इतिहासात झालं नाही ते करून दाखवलं

Sri Lanka Vs South Africa
Sri Lanka Vs South Africa esakal

Sri Lanka Vs South Africa : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये तिसऱ्याच सामन्यात मोठमोठे विक्रम एका झटक्यात मोडले. दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना खेळताना वर्ल्डकपमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभी केली.

दिल्लीतील नव्या रूपात सजलेल्या अरूण जेटली स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफान आतशबाजी केली. त्यांनी 50 षटकात 5 बाद 428 धावा ठोकल्या. ही वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. याचबरोबर माक्ररमने देखील मोठा विक्रम मोडला. त्याने 54 चेंडूत 106 धावा ठोकत वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतक (49 चेंडूत) ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

Sri Lanka Vs South Africa
Asian Games 2023 : अब की बार 107! बुद्धीबळातील दोन रौप्य पदकाने भारताची ऐतिहासिक एशियन गेम्सची मोहीम संपली

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 च्या तिसऱ्या दिवशी आज दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगला. हा सामना नुतनिकरण झालेल्या अरूण जेटली स्टेडियमवरील पहिलाच सामना होता. त्यामुळे ही खेळपट्टी कशी खेळते याबाबत सर्वांना उत्सुकता होती. दक्षिण आफ्रिकने या खेळपट्टीचे उद्घाटन वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावसंख्या उभारून केले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि कर्णधार टेम्बा बाऊमाला 8 धावांवर बाद करत श्रीलंकेने पहिल्या विकेटचा जल्लोष केला. मात्र हा जल्लोष फार काळ टिकला नाही.

सलामीवीर क्विंटन डिकॉकने वॅन डेर दुसेनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 254 धावांची दमदार भागिदारी रचली. डिकॉकने 84 चेंडूत 100 धावा ठोकल्या तर त्याला साथ देणाऱ्या दुसेनने देखील 110 चेंडूत 108 धावा ठोकत आफ्रिकेला 37 व्या षटकाच 264 धावांपर्यंत पोहचवले.

Sri Lanka Vs South Africa
CWC 2023 VIDEO : लॉर्ड शार्दुलला अष्टपैलू म्हणायचं का... अनुभवी सुरेंद्र भावेंचे काय आहे एक्सपर्ट ओपिनियन?

यानंतर एडिन माक्ररमने तुफान राडा केला. त्याने तर 14 चौकार आणि 3 षटकार ठोकत 54 चेंडूत 106 धावा ठोकल्या. त्याने वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतकाचा केविन ओब्रायनचा 12 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. त्याचबरोबर क्लासेन (32) आणि मिलरने (39) देखील तडाखे देत आफ्रिकेला 50 षटकात 5 बाद 428 धावा उभ्या करून दिल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com