ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारासाठी कोण ठरले होते संताजी-धनाजी? वाचा सविस्तर..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

आताच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार ऍरॉन फिन्चसाठी विराट-रोहित हे जणू काही संताजी-धनाजीसारखेच आहेत.

लंडन :  संताजी-धनाची यांची पाण्यातही दिसणारी छबी मोघलाना दहशत बसवणारी होती. आताच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार ऍरॉन फिन्चसाठी विराट-रोहित हे जणू काही संताजी-धनाजीसारखेच आहेत. त्यांना कसे बाद करायचे, यासाठी त्याने आपल्याकडे विचारणा केली होती, अशी माहिती त्या वेळी मैदानावर असलेले पंच मायकेल गॉफ यांनीच उघड केली. 

वाचा ः ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटविश्वात सर्वोत्तमच आहे. या प्रकारचे विक्रम एक तर विराट किंवा रोहितच्या नावावर आहे. हे दोघेही मैदानावर असतात तेव्हा फिन्चच काय प्रतिस्पर्धी संघांच्या मनात धडकी भरलेली असते. विराट आणि रोहित यांना बाद करण्याचा प्रश्न विचारणाऱ्या फिन्चला, तूच यातून मार्ग काढ, असा सल्ला मी त्याला दिल्याचे पंच गॉफ यांनी सांगितले. 

वाचा ः पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

मला तो सामना चांगला आठवतोय, जानेवारीत बंगळुर येथे भारत-ऑस्ट्रेलियातील लढत होती. 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली (89) आणि रोहित शर्मा (119) यांनी तुफानी टोलेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची निर्णायक भागीदारी केली होती.  गॉफ म्हणतात, मी स्क्वेअर लेगला होतो, फिन्च माझ्या बाजूलाच उभा होता, या दोघांचा खेळ पाहणे अविस्मरणीय असते... एवढे बोलून झाल्यावर या दोघांना बाद कसे करायचे, असा प्रश्न फिन्चने मला केला... 

वाचा ः कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे

मी तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले... माझ्याकडे माझे भरपूर काम आहे, त्यांना कसे बाद करायचे हे तुलाच ठरवायचे आहे... असे आपण फिन्चला सांगितले. गॉफ हे अनुभवी पंच आहेत. डरहॅम क्‍लबकडून ते 67 प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत. ते ऑफस्पिनर गोलंदाज होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aron finch always worried to bold rohit sharma and virat kohli