Ashes Series England Playing 11 : महत्वाच्या सामन्यातच जेम्स अँडरसनला ठेवलं बाहेर; निवृत्तीचे संकेत?

Ashes Series England Playing 11
Ashes Series England Playing 11 esakal

Ashes Series England Playing 11 : अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा एक दिवस आधीच केली आहे. उद्यापासून हेडिंगले कसोटी सुरू होत आहे ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी लीड्स कसोटी मालिका वाचवण्यासाठी महत्वाची आहे.

Ashes Series England Playing 11
WI vs IND India's T20I squad : तिलक वर्मा, यशस्वी जैसवालला लागली टी 20 ची लॉटरी; रिंकू सिंहकडे केलं दुर्लक्ष

इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा करतना आपला अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संघाबाहेर ठेवले आहे. त्याच्या ऐवजी मार्क वूडला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. याचबरोबर मोईन अल आणि ख्रिस वोक्स यांनी देखील संघात पुनरागमन केले आहे. मोईन अली दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

इंग्लंडच्या संघात मोईन अली आणि आणि वोक्स आल्याने इंग्लंडच्या फलंदाजी आणि गोलंदाजी विभागाची ताकद वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने एजबेस्टन आणि लॉर्ड्सवर इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे इंग्लंडला अॅशेस वाचवण्यासाठी तिसरा सामना जिंकणे गरजेचे आहे.

जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर पॅट कमिन्स 22 वर्षात इंग्लंडमध्ये जाऊन अॅशेस जिंकणारा पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरले.

Ashes Series England Playing 11
Wimbledon 2023 : 'जस्ट स्टॉप ऑईल'वाल्यांनी विंबल्डनमध्येही केला राडा; सामना थांबला

इंग्लंडची प्लेईंग 11 :

बेन स्टोक्स, जो रूट, हॅरी ब्रुक, झॅक क्रावले, बेन डकेट, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, ओली रॉबिन्सन, मार्क वूड.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com