Asia Cup 2025: India vs Pakistan Preview
esakal
India beat UAE in style to kickstart Asia Cup 2025, now all eyes on the India vs Pakistan clash : संयुक्त अरब अमिराती संघाला सहजगत्या पराभूत करून आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार सलामी देणाऱ्या भारतीय संघाला आता पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचे वेध लागले आहेत. आम्ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, असे कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले. अमिराती संघावर मोठा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानला इशारा दिला का, या प्रश्नावर सूर्यकुमारने सावध उत्तर दिले. आम्ही सर्व जण उत्साहित आहोत, असे तो म्हणाला.