Shubman Gill Injury Scare Before Pakistan Clash
esakal
Asia Cup 2025 India vs Pakistan match faces a twist as Shubman Gill suffers hand injury in practice : आशिया चषकात आज पारंपारिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत सुपर ४ मधील दावेदारी मजबूत करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
मात्र, त्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे उपकर्णधार शुभमन गिलच्या दुखापत झाल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे गिल पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळणार की नाही, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.