
Asia Cup Final Shock Naqvi Says Trophy Will Be Given Only on Condition
Esakal
India vs Pakistan: आशिया कप स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला ट्रॉफीशिवाय आनंद साजरा करावा लागला. आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहम्मद नकवी यांच्या हस्ते भारतीय संघानं ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर नकवी हे ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन मैदानातून निघून गेले होते. आता ट्रॉफी भारतीय संघाकडे सोपवण्यास नकवी तयार आहेत. मात्र यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. शिवाय ते पाकिस्तानच्या शरीफ यांच्या सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंसोबतची त्यांचं वागणं आश्चर्यचकित करणारं नाहीय.