
Trophy Controversy Rocks Asia Cup Final, Pakistan Blames India
Esakal
India Vs Pakistan: आशिया कपच्या सुरुवातीपासूनच भारत - पाक सामन्यावरून वाद सुरू झाला होता. भारताने पाकिस्तानविरुद्ध सामने खेळू नयेत अशी मागणी होत होती. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या मैदानातील कृत्यानंतरही नवे वाद झाले. तर अंतिम सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. भारतानं पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेत तिन्ही सामन्यात धूळ चारली. स्पर्धा जिंकल्यानंतर भारतानं आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे बराच वेळ नक्वी यांच्यासह इतरांना मैदानात हातावर हात ठेवून थांबावं लागलं. दरम्यान, शेवटी नक्वी हे आशिया कपची ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन गेले. यामुळे भारतीय संघाला विजय मिळूनही ट्रॉफी मिळाली नाही. या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर बोलताना पाकिस्तान संघाचा कर्णधार यानं भारतावरच आरोप केलेत.