esakal | अजिंक्‍य क्रिकेटच्या मैदानावरचा सैनिक - मधुकर रहाणे
sakal

बोलून बातमी शोधा

ajinkya-rahane

खरोखरच हा आनंद व्यक्त करताना आमचा उर भरून येत आहे. मी स्वतः जिल्हास्तरीय कबड्डी आणि खो-खो खेळ खेळलेलो आहे. आमच्याकडे क्रिकेटची पार्श्‍वभूमी नाही तरीही अजिंक्‍यने हा खेळ निवडला.

अजिंक्‍य क्रिकेटच्या मैदानावरचा सैनिक - मधुकर रहाणे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - सैनिक सीमेवर लढतात माझा अजिंक्‍यही जवान आहे तो क्रिकेटच्या मैदानावर लढतो आपल्या पद्धतीने खेळतो पण संघाच्या हितासाठी सर्वस्व देत असतो, असे भावनिक उद्‌गार मधुकर रहाणे अर्थात अजिंक्‍यच्या वडिलांनी काढले. आपल्या मुलाने देशाला मिळवून दिलेल्या यशाने सार्थक झाल्याची भावना मधुकर रहाणेंच्या डोळ्यात चमकत होती.

INDvsAUS: टीम इंडियाची मापं काढणाऱ्यांचे दात घशात!​

प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती त्यात पहिल्या सामन्यात झालेला दारुण पराभव अशा परिस्थितीत कर्णधारपदाचा काटेरी मुकुट अजिंक्‍यच्या डोक्‍यावर आला, पण या मुकुटाचा सन्मान त्याने ऑस्ट्रेलियात राखला आणि येथे मुंबईत त्याचे कुटुंबीय प्रामुख्याने वडील आपल्या मुलाची मेहनत सार्थकी लागल्याचे सांगत होते. 

INDvsAUS : 'मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर राहुल द्रविड!'​

खरोखरच हा आनंद व्यक्त करताना आमचा उर भरून येत आहे. मी स्वतः जिल्हास्तरीय कबड्डी आणि खो-खो खेळ खेळलेलो आहे. आमच्याकडे क्रिकेटची पार्श्‍वभूमी नाही तरीही अजिंक्‍यने हा खेळ निवडला. सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, पण मुळातच असलेली गुणवत्ता त्याच्यासाठी मार्ग निर्माण करणारी ठरली, असे मधुकर यांनी गर्वाने सांगितले. सेहवाग जखमी झाला आणि अजिंक्‍यला संघासाठी बोलावणे आले आणि आता कर्णधार म्हणून त्याने अख्ख्या देशाला अभिमान वाटेल असे यश मिळवले. त्याचे फलंदाजीतले तंत्र असो वा नेतृत्व करण्याचा विचार असो त्याने स्वतःच निर्माण केलेले आहे. वयोगटात खेळत असताना कधी कधी निवड व्हायची नाही तेव्हा तो आईकडे येऊन चिडचिड करायचा. आपल्याला अधिक चांगला खेळ कसा करता येईल यासाठी प्रयत्न करायचा. त्याची मेहनत करण्याची क्षमता अफाट आहे म्हणूनच तो आज हे यश मिळवत आहे, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

INDvsAUS : ३२ वर्ष अजिंक्य ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली; भारतानं चौथ्यांदा केलाय असा पराक्रम​