टी-20 विश्वचषकाबाबत भारताचे दबावतंत्र; ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि क्रिकेट मंडळात मात्र मतभिन्नता...

t20 trophy.
t20 trophy.

मेलबर्न : एकीकडे आयसीसी विश्वकरंडक ट्वेन्टी-20 स्पर्धेबाबत तारीख पे तारीखचा खेळ करत असताना यजमान असलेल्या ऑस्ट्रेलियात एकवाक्यता राहिलेली नाही. 10 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा खेळवण्याचा निर्धार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान व्यक्त करत आहेत; तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया मात्र स्पर्धा होणे अशक्यच असल्याचा पुनरुच्चार करत आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रशासनात अगोदरच कॉस्ट कटिंग सुरू केलेली आहे. कालच मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी राजीनामा दिलेला आहे. रॉबर्ट्सही ही विश्वकरंडक स्पर्धा नियोजित काळात होणार नसल्याचे सांगत होते. आता तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्याध्यक्ष एरल एडिंग्स यांनीही या स्पर्धबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर असा या विश्वकरंडक स्पर्धेचा कालावधी आहे; परंतु कोरोनाच्या महामारीने सर्वांचीच कोंडी केलेली आहे. ही स्पर्धा अजून अधिकृतपणे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आलेली नाही; परंतु स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या 16 देशांच्या संघांना सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियात आणणे सोपे नाही. त्यामुळे स्पर्धेचे भवितव्य कठीण असल्याचे एडिंग्स यांनी वर्च्युअल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. लवकरात लवकर या स्पर्धेबाबत निर्णय घ्या, असेही आम्ही आयसीसीला सांगितले असल्याचे एडिंग्ज म्हणाले. एकीकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ स्पर्धेच्या नियोजित कालावधीतील आयोजनास तयार नसले, तरी आयसीसी मात्र निर्णय लांबवत आहे. 28  मे रोजी झालेल्या बैठकीत 10 जूनची तारीख देण्यात आली होती. आता 10 जून रोजी झालेल्या बैठकीतून पुढील महिन्यापर्यंत निर्णय लांबवण्यात आला आहे.

स्पर्धेचे ठरल्याप्रमाणे आम्ही नियोजनच करणार नाही, तर 40 हजार प्रेक्षकसंख्येच्या स्टेडियममध्ये 10 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीची सोय करू, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यामुळे ही स्पर्धा होण्याबाबतची शक्यता वाढली होती. ही स्पर्धा पुढे ढकलली जाईल आणि तो कालावधी आायपीएलला मिळेल, अशी अपेक्षा बीसीसीआय करत आहे. त्याच दृष्टीने विचार आणि प्रयत्नही सुरू झालेले आहेत; पण आयसीसीच्या तारखांचा खेळ आणि ऑस्ट्रेलिया पंतप्रधांनांची जाहीर वक्तव्ये यामुळे बीसीसीआयने वेट आणि वॉचची भूमिका घेतली आहे.

भारतीय मंडळाचे दबावतंत्र
ऑस्ट्रेलिया सरकारची भूमिका आणि आयसीसीचे निर्णय लांबवण्याचा प्रयत्न यामुळे सावध झालेल्या बीसीसीआयनेही अडचणीत आणण्याचा डाव टाकला. वर्ल्डकप खेळणे प्रत्येकाला बंधनकारक असले, तरी सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच आम्ही आमचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया  बीसीसीआयमधून उमटली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com