esakal | रविवारी खंडग्रास 'सूर्यग्रहण' पाहण्याची संधी, ही असेल वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

khandgras

विशेष म्हणजे कुरुक्षेत्रावरुन या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे. 

रविवारी खंडग्रास 'सूर्यग्रहण' पाहण्याची संधी, ही असेल वेळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाणे :  रविवारी (ता. 21) भारतीयांना सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील नागरिकांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. तर राजस्थान,  पंजाब,  हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरीत भारतात मात्र खंडग्रास स्थितीतील सूर्यग्रहण दिसेल. विशेष म्हणजे कुरुक्षेत्रावरुन या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे. 

नक्की वाचा : वातावरण बदलल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली; यावर डॉक्टर म्हणतात...

कंकणाकृती सूर्यग्रहणाची वेळ 
रविवार 21 जूनला सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून 12 वाजून 2 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. 

महत्वाची बातमी : मुंबई विमानतळावरुन विमान उड्डाणांची संख्या वाढणार, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

महाराष्ट्रातील सूर्यग्रहणाची वेळ
मुंबईतून रविवार 21 जूनला सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे 70 टक्के ग्रासित दिसेल. दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतू मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येण्याची शक्यता असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच पुणे येथून सकाळी 10.03 ते दुपारी 01.31, नाशिक येथून सकाळी 10.04 ते दुपारी 01.33, नागपूर येथून सकाळी 10.18 ते दुपारी 1.51 , औरंगाबाद येथून सकाळी 10.07 ते दुपारी 1.37 यावेळेत हे सूर्यग्रहण दिसेल.

मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

काय आहे कंकणाकृती सूर्यग्रहण
खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच ‘कंकणाकृती‘ अवस्था म्हणतात. यंदा हे सूर्यग्रहण राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून हरियाणामधील कुरुक्षेत्र येथून हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. कुरुक्षेत्र हे महान तीर्थक्षेत्र असल्याने तेथील ब्रह्मासरोवरावरावर तीर्थस्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता होण्याची शक्यता असल्याचे दा.कृ. सोमण यांनी सांगितले.  

नक्की वाचा : खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, 'सामना'तून काँग्रेसवर निशाणा

हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका,  दक्षिण पूर्व यूरोप,  मिडलइस्ट,  इंडोनेशिया,  मायक्रोनेशिया येथून दिसेल. यानंतर पुन्हा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग 21 मे 2031 रोजी येणार असून त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची  कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग थेट 3 नोव्हेंबर 2404 रोजी येणार आहे.

- दा.कृ. सोमण, खगोल अभ्यासक

morning time to watch solar eclipse on Sunday in maharashtra