INDvsAUS : भारतात यायचंय तर 'हे' संघात हवेच; ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर 

Australian squad for ODI vs India declared
Australian squad for ODI vs India declared
Updated on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला. या संघात ऑस्ट्रेलियाचे आधारस्तंभ डेव्हिड मिलर आणि स्टिव्ह स्मिथ यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच मार्नस लाबूशेन याला एकदिवसीय संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलिया संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या संघाचे प्रशिक्षकसुद्धा नवीनच आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना विश्रांती देण्यात आली असून अॅंड्र्यू मॅकडोनाल्ड हे संघाचे प्रशिक्षण करणार आहे. 

विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग असणारे ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोनिस आणि नॅथन लायन यांना भारताविरुद्धच्या एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. तसेच उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि नेथन कुल्टर नाईल यांनाही संघात संधी देण्यात आलेली नाही. प्रमुख गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार असून पहिला सामना 14 जानेवारीला मुंबईमध्ये होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार), सिन अबॉट, अॅश्टन अॅगर, अलेक्स केरी, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबूशेन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा.

पहिली ODI - 14 जानेवारी, मुंबई
दुसरी ODI - 17 जानेवारी, राजकोट
तिसरी ODI - 19 जानेवारी, बंगळूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com