esakal | फुलराणी सुद्धा पाच दिवसांत कोर्टवर येणार; कुठे आणि कधीपासून सराव होणार सुरु ?
sakal

बोलून बातमी शोधा

pv sindhu.

हैदराबादमधील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे तेलंगणा सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. महामारीमुळे बॅडमिंटनपटूंच्या सरावाचा ब्रेक लांबला आहे. आम्ही 1 जुलैपासून सराव करण्याचे ठरवले,

फुलराणी सुद्धा पाच दिवसांत कोर्टवर येणार; कुठे आणि कधीपासून सराव होणार सुरु ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्लीः पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालसह भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंचा सराव 1 जुलैपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. सराव हैदराबादच्या गोपीचंद अकादमीत होणार असल्याने त्यास तेलंगणा सरकारची मंजुरी आवश्‍यक आहे. यासंदर्भात भारतीय बॅडमिंटन संघटनेने चर्चा सुरू केली असल्याचे समजते. 

सोमवारपर्यंत मृत्यूंची माहिती सादर करा; अन्यथा कठोर कारवाई... वाचा सविस्तर...

भारताच्या काही आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी बेंगळूरु येथील प्रकाश पदुकोण अकादमीत सराव सुरू केला आहे; तर एच. एस. प्रणॉय केरळमधील अकादमीत खेळत आहे. भारताचे बहुतेक सर्व आघाडीचे बॅडमिंटनपटू राष्ट्रीय मार्गदर्शक गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करतात; पण ही अकादमी खुली झालेली नाही. 

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली; तब्बल 'इतक्या' इमारती केल्यात सील...

हैदराबादमधील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे तेलंगणा सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. महामारीमुळे बॅडमिंटनपटूंच्या सरावाचा ब्रेक लांबला आहे. आम्ही 1 जुलैपासून सराव करण्याचे ठरवले, पण हे सर्व तेलंगणा सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असेल, असे भारतीय बॅडमिंटन महासंघाचे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले. 

पर्यटकांना आता समुद्रकिनारी मिळणार चौपाटी कुटीचा आनंद; राज्यात 'या' किनाऱ्यावर मिळणार सुविधा...

अर्थात कोरोना महामारीमुळे देशातील चारपैकी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यात हैदराबाद ओपन सुपर (11 ते 16 ऑगस्ट) आणि पुण्यातील इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल ग्रांप्रि (4 ते 9 ऑगस्ट) या स्पर्धा आहेत; तर इंडिया ओपन आता 8 ते 13 डिसेंबरदरम्यान होणार आहे. 

कोरोनाकाळातील कामगिरीचा परिणाम, नवी मुंबई आयुक्तांच्या बदलीचा निर्णय स्थगित

देशांतर्गत स्पर्धा सप्टेंबरनंतरच सुरू 
भारतीय संघटनेने लखनौत 27 एप्रिल ते 3 मेदरम्यान ठरलेली राष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर टाकली आहे. सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्याचा संघटनेचा विचार नाही. ""देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्याबाबत आम्ही संलग्न सर्व राज्य संघटनांबरोबर चर्चा केली आहे. त्यानुसार या स्पर्धा सप्टेंबरपर्यंत सुरू न करण्याचे ठरवले आहे. सप्टेंबरमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय होईल, "असे सिंघानियांनी सांगितले. संघटनेने फेब्रुवारीत देशांतर्गत स्पर्धेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्पर्धा तीन स्तरांवर घेण्याचे ठरवले. देशांतर्गत स्पर्धेत एकंदर दोन कोटींची बक्षिसे देण्याचे ठरले आहे.

loading image