IND vs BAN : भावी कर्णधार हार्दिकच संघातून गायब; बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

IND vs BAN ODI Series Hardik Pandya Not Included
IND vs BAN ODI Series Hardik Pandya Not Included esakal

IND vs BAN Hardik Pandya : बीसीसीआयने नुकतेच बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे या संघात भारताचा भावी टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याचेच नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. या संघात रोहित शर्मा तसेच विराट कोहली परतले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

IND vs BAN ODI Series Hardik Pandya Not Included
FIFA World Cup 2022 : चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीला जपानने दिला पराभवाचा धक्का

भारतीय संघ येत्या 4 डिसेंबरपासून बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पहिल्यांदा तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतेच टीम इंडियाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे विश्रांती संपवून भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली संघात परतले आहेत. अनुभवी खेळाडूंबरोबरच या संघात काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश आहे.

मात्र आश्चर्याची बाब म्हणजे न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पांड्याचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. बहुदा त्याला वर्ल्डकप आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर रोटेशन पॉलिसी अंतर्गत विश्रांती देण्यात आली असावी. मात्र याबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत कोणताही माहिती दिलेली नाही.

IND vs BAN ODI Series Hardik Pandya Not Included
ICC T20 Ranking : नवी T20 Ranking झाली जाहीर; रिझवान सूर्याला मागं टाकतोय?

भारतीय वनडे संघ पुढीप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com