esakal | चला, तयारीला लागा..!! वाचा गांगुलीने कशाबद्दल केलंय हे वक्तव्य...
sakal

बोलून बातमी शोधा

saurav ganguli

ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) अद्याप निर्णय घेण्यास चालढकल करत असली, तरी बीसीसीआयने मात्र आयपीएलच्या आयोजनासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे

चला, तयारीला लागा..!! वाचा गांगुलीने कशाबद्दल केलंय हे वक्तव्य...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) अद्याप निर्णय घेण्यास चालढकल करत असली, तरी बीसीसीआयने मात्र आयपीएलच्या आयोजनासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पर्यायांचा विचार करत आहोत. प्रेक्षकांविना खेळण्याचीही आपली तयारी आहे. तुम्हीही तयारीला लागा, असे पत्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संलग्न राज्य संघटनांना पाठवले आहे. 

वाचा ः मार्गदर्शकांबरोबर करार संपला आहे, संपवलेला नाही; राही सरनोबतचे स्पष्टीकरण

बीसीसीआय सर्व पर्याचांचा विचार करत आहे. आयपीएलचा यंदाचा 13 वा मोसम आपण यंदाच घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रेक्षकांविना ही स्पर्धा खेळवावी लागली, तरी आपली त्यास तयारी आहे, असे गांगुली यांनी राज्य संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

वास्तविक यंदाची आयपीएल 29 मार्चपासून सरू होणार होती; परंतु कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारी ट्‌वेन्टी-20 विश्वकरंडक पुढे ढकलली जाईल आणि तो कालावधी आपल्याला आयपीएल घेण्यासाठी मिळेल, अशी बीसीसीआयची अपेक्षा आहे; पण आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेबाबतचा निर्णय लांबवत असली, तरी बीसीसीआयने मात्र मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाचा ः बोधचिन्ह बदलास कार्यकारिणीत विरोध? अंतिम निर्णय एमसीएच्या वार्षिक सभेतच होणार...

देशात सध्या तरी सर्व क्रिकेट घडामोडी बंद असल्या, तरी सराव आणि स्पर्धात्मक क्रिकेट पुढील दोन महिन्यांत सुरू होईल, अशी आशा गांगुली यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. कोरोनानंतर देशातील क्रिकेट कसे असेल, यासाठी बीसीसीआय समान कृती नियम तयार करणार आहे. त्यानुसार प्रत्येक राज्य संघटनांना मार्गदर्शक नियमावली पाठवण्यात येईल आणि त्यानुसार आपापल्या राज्यातील क्रिकेट सुरू करायचे आहे, असेही गांगुली यांनी या पत्रात म्हटले आहे. देशांतर्गत क्रिकेटबाबत गांगुली यांनी म्हटले आहे की, देशातील सर्व प्रकारच्या आणि सर्व वयोगटातील स्पर्धा होण्यासाठी बीसीसीआय वेगवेगळ्या पर्यायांसह विचार करत आहे. येत्या एक- दोन आठवड्यात ठोस कार्यक्रम तयार करण्यात येईल. 

वाचा ः क्या बात है..! सुधागड तालुका झाला कोरोनामुक्त...

सर्वांची देणी पूर्ण करणार 
लॉकडाऊनचा कालावधी असला, तरी बीसीसीआय ज्यांचे पैसे देणे लागते, मग ते निधी असेल किंवा अनुदानही, ज्यांनी ज्यांनी त्यांचे अकाऊंट्‌स योग्य पद्धतीने दाखल केले आहेत, त्यांचे पैसे आम्ही देत आहोत, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.