
नव्वद वर्षे जुने असलेले मुंबई क्रिकेट संघटनेचे बोधचिन्ह बदलण्याचा प्रस्ताव केवळ समोर आला होता. त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
मुंबई ः नव्वद वर्षे जुने असलेले मुंबई क्रिकेट संघटनेचे बोधचिन्ह बदलण्याचा प्रस्ताव केवळ समोर आला होता. त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा अंतिम निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभाच घेईल, असे मुंबई क्रिकेट संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा ः क्या बात है..! सुधागड तालुका झाला कोरोनामुक्त...
मुंबई क्रिकेट संघटनेचे संकेतस्थळ जास्त आकर्षक करण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. त्या वेळी संघटनेतील सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपैकी एका व्यक्तीने संघटनेचे बोधचिन्ह बदलण्याची सूचना केली. त्या वेळी त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले पारंपरिक बोधचिन्ह बदलले आहे, याकडे लक्ष वेधले. मात्र याबाबतचा विषय विषयपत्रिकेवर नाही, असे सांगत सदस्यांनी त्यास विरोध केला होता.
वाचा ः मुंबई महापालिकेकडून 'या' भागातल्या तब्बल 790 इमारती सील
संघटनेच्या संकेतस्थळाचे स्वरूप जास्त आकर्षक करताना समाजमाध्यमांवरही प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने विचार होत आहे. त्यातूनच बोधचिन्हाचा विषय समोर आला होता; मात्र त्याबाबत विस्तृत चर्चाही झालेली नाही, असेही काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत एक प्रेझेंटेशन सादर करण्यात आले.
वाचा ः मान्सूनच्या आगमनाने मुंबईकर सुखावले! शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची एन्ट्री
त्याचा ई-मेल सर्व कार्यकारिणी सदस्यांना पाठवण्यात आला आहे. त्याबाबत कदाचित आगामी कार्यकारिणीत चर्चा होऊ शकेल, असे एका वरिष्ठ सदस्यांनी सांगितले. मुंबई संघटनेच्या कार्यकारिणीतील अनेक सदस्यांचा बोधचिन्हातील बदलास कडवा विरोध असल्याचेही समजते. हे बोधचिन्ह काही वीस-पंचवीस वर्षांपूर्वी तयार झालेले नाही. त्याला नव्वद वर्षांचा इतिहास आहे. 1930 पासून हे संघटनेचे बोधचिन्ह आहे. ती संघटनेची ओळख आहे, ती बदलण्यास परवानगी कशी देता येईल, अशी संतप्त विचारणाही काही पदाधिकाऱ्यांनी केली.
वाचा ः रुग्णालयातून पळालेल्या 'त्या' वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; ट्रेनच्या धडकेत गमावला जीव.
अध्यक्ष विजय पाटील यांनी एमसीए बोधचिन्ह बदलण्याची सूचना केली. याबाबतचे प्रेझेंटेशन सादर करण्याबाबत काहीही ठरले नव्हते. हा विषय पत्रिकेवर नसल्याने त्यास अधिकृत महत्त्व नाही. कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्यास याबाबत बैठकीपूर्वीच माहिती हवी होती. बोधचिन्ह बदलेल, असे मला वाटत नाही. त्यास माझा कडवा विरोध असेल.
- शाह आलम शेख, मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव