'बीसीसीआय'च्या सल्लागार समितीमध्ये 'हे' दोन माजी क्रिकेटपटू!

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

भारतीय महिला क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांची या समितीतील तिसऱ्या सदस्यपदी निवड होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्य म्हणून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी क्रिकेटपटू मदन लाल यांची निवड होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या समितीकडूनच बीसीसीआयच्या नवीन निवड समितीची निवड केली जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांची या समितीतील तिसऱ्या सदस्यपदी निवड होण्याची शक्यता आहे. 

- बुमरा, पुनम यादवला बीसीसीआयचे प्रतिष्ठेचे पुरस्कार

मदन लाल, 1983च्या विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू या समितीचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत गंभीर आणि नाईक यांचाही या समितीमध्ये समावेश असेल. 

- 'तो' सध्या काय करतो!

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्याजागी दुसऱ्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करणे हे या सल्लागार समितीचे प्रमुख काम असणार आहे. या समितीबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता.14) केली जाण्याची शक्यता आहे.

- वर्ल्ड कपमधील 'त्या' गोष्टीचा आजही पश्चाताप होतो : धोनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI likely to appoint former Indian cricketer Madan Lal and Gautam Gambhir as CAC Members