पक्क ठरलंय! रोहितच घेणार विराटची जागा; पण...

rohit sharma and virat kohli
rohit sharma and virat kohli sakal

Test Captain of Team India : विराट कोहलीने अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियात त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय संघाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत वरिष्ठ खेळाडूंसह काही युवा क्रिकेटर्सची नावेही चर्चेत आहेत. या सगळ्या चर्चा रंगत असताना बीसीसीआयने टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माचे नाव जवळपास निश्चित केले असल्याचे वृत्त समोर येत आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाऊ शकते. (Rohit Sharma Latest News New Test Captain Of Team India)

rohit sharma and virat kohli
Video: सचिन तेंडुलकर प्रजासत्ताक दिनी कोणत्या अधिकाराबद्दल बोलतोय?

बीसीसीआयच्या (BCCI) अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या वृत्तानुसार, बोर्डाने लाल चेंडू क्रिकेटसाठी आपला पुढचा कर्णधार निवडला आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधाराच्या नावाची घोषणा केली जाईल. या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'रोहित शर्मा भारताचा नवा कसोटी कर्णधार असेल यात शंका नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले असून आता त्याला बढती देऊन संघाचा कर्णधार बनवण्यात येणार आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की रोहितला अतिरिक्त भार सहन करण्यासाठी त्याच्या फिटनेसवर अतिरिक्त काम करावे लागेल. ते म्हणाले की, 'रोहितवर कामाचा ताण वाढेल. त्यांनी स्वत:ला चपळ आणि तंदुरुस्त ठेवण्याची गरज आहे. मला वाटते की निवडकर्ते याबद्दल त्याच्याशीही बोलतील. त्याला त्याच्या फिटनेसवर जास्त मेहनत करावी लागणार आहे.

rohit sharma and virat kohli
पाकिस्तानच्या थव्यात टीम इंडियाची स्मृती चमकली!

वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने रोहितनंतर भावी कर्णधार तयार करण्याच्या बोर्डाच्या योजनेचाही उल्लेख केला आहे. केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह ही सर्वजण भविष्यातील कर्णधार होऊ शकतात. निवडकर्ते त्यांच्यापैकी एकाला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देतील. भविष्यात कर्णधारपदासाठी त्यांची योग्य तयारी करण्यासाठी निवडकर्त्यांना असा निर्णय घ्यायचा आहे.

टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 25 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. जर रोहित शर्माची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली, तर पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची ही पहिलीच कसोटी मालिका असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com