मिताली राज-अश्विनची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

अर्जुन पुरस्कारासाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन, लोकेश राहुल आणि जसप्रित बुमराह यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे.
Mithali Raj, R Ashwin
Mithali Raj, R Ashwin Twitter

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी महिला आणि पुरुष अशा दोन गटातून दोन नावांची शिफारस केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी महिला क्रिकेटमधील कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज आणि आघाडीचा फिरकीपटू आर अश्विन यांची नावे आहेत. (BCCI to recommend Mithali Raj, R Ashwin for Khel Ratna Award)

अर्जुन पुरस्कारासाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन, लोकेश राहुल आणि जसप्रित बुमराह यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. मागील वर्षी शिखर धवनकडे दुर्लक्ष झाले होते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेटमधील एकाही खेळाडूच्या नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. खेलरत्न पुरस्कारासाठी मिताली राजच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. या पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडून नियुक्त पॅनेल अंतिम निर्णय घेत असते.

Mithali Raj, R Ashwin
Video : मैदानावर स्टार प्लेयर तर स्टेडियममध्ये त्यांच्या आया भांडल्या

मिताली राजने इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यावर 22 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा खास विक्रम आपल्या नावे केला होता. 38 वर्षीय मिताली राजच्या खात्यात 7 हजारहून अधिक धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखं यश मिळवले आहे. दुसरीकडे आर अश्विन सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसतोय. अश्विनने 79 कसोटीत 413 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अनुक्रमे 150 आणि 42 विकेट घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com