सर्वोकृष्ट फुटबॉलरसाठी मेस्सी, रोनाल्डोने कोणाला दिले मत? |Best Mens Footballer 2021 who was the first Choice of Messi and Ronaldo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Mens Footballer 2021 Messi and Ronaldo first Choice
सर्वोकृष्ट फुटबॉलरसाठी मेस्सी, रोनाल्डोने कोणाला दिले मत?

सर्वोकृष्ट फुटबॉलरसाठी मेस्सी, रोनाल्डोने कोणाला दिले मत?

पोलंडचा आणि बायर्न म्युनिचचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने (Robert Lewandowski) फिफाच्या 2021 मधाला सर्वोकृष्ट फुटबॉलर पुरस्कारावर नाव कोरले. २०२१ चा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (FIFA 2021 Best Player) पुरस्कार लेवांडोवस्कीला जाहीर झाला. तर महिलांमध्ये Alexia Putellas सर्वोत्कृष्ट प्लेअर ठरली. लेवांडोवस्कीने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (Lionel Messi) या दिग्गज फुटबॉलपटूला मागे टाकले. (Best Mens Footballer 2021 Messi and Ronaldo first Choice)

हेही वाचा: FIFA 2021 : मेस्सीला मागे टाकत लेवांडोवस्की ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

दरम्यान, या पुरस्कारासाठी अनेक खेळाडूंनी आपले मत दिले होते. अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने या पुरस्कारासाठी ब्राझीलच्या नेमारला (Neymar) पहिली पसंती दिली होती. त्यानंतर मेस्सीने कायलन एम्बाप्पे आणि करीम बेंझेमा यांना आपली पसंती दिली होती. (Best Men's Footballer 2021)

हेही वाचा: FIFA प्लेअर ऑफ द इयर अलेक्सिया पुटेलास आहे तरी कोण?

दुसरीकडे ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सर्वोकृष्ट फुटबॉलर 2021 पुरस्कारासाठी पहिली पसंती रॉबर्ट लेवांडोवस्कीला दिली होती आणि त्यालाच तो पुरस्कार मिळाला. त्यानंतर रोनाल्डोने एनगोलो कांटे आणि जॉर्जिनो यांना पसंती दिली होती. पुरस्कारप्राप्त रॉबर्ट लेवांडोवस्कीने आपली पसंती जॉर्जिनोला दिली होती. त्यानंतर त्याने मेस्सी आणि रोनाल्डोला पसंती दिली होती. भारताचा स्टार फुटबॉलर सुनिल छेत्रीने (Sunil Chhetri) रॉबर्ट लेवांडोवस्कीला पहिली पसंती दिली होती.

Web Title: Best Mens Footballer 2021 Who Was The First Choice Of Messi And Ronaldo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..