कधी शॉट सर्किट तर कधी मांजर, बेंगलोर-पंजाब मॅचमध्येही पाहायला मिळाला ड्रामा | Black cat sitting on sight screen at brabourne stadium RCB vs PBKS ipl match | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Black cat sitting on sight screen at brabourne stadium
कधी शॉट सर्किट तर कधी मांजर, बेंगलोर-पंजाब मॅचमध्येही पाहायला मिळाला ड्रामा

कधी शॉट सर्किट तर कधी मांजर, बेंगलोर-पंजाब मॅचमध्येही पाहायला मिळाला ड्रामा

दोन दिवसांपूर्वी झालेल्या चेन्नई आणि मुंबई सामन्यात शॉट सर्किटमुळे पहिल्या षटकाच्या 10 चेंडूवर डीआरअएस घेता आला नाही. त्यामुळे सामन्यात अडथळा निर्माण झाला होता. आता या सामन्यातनंतर काल झालेल्या बेंगलोर विरुद्ध पंजाबमध्ये असेच काहीचे घडले. त्यामुळे काही काळ मॅच थांबवावी लागली.

हेही वाचा: वानखेडेची बत्ती गुल, चेन्नई DRS ला मुकली; अंबानींचे मीम्स व्हायरल

पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील 60 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 54 धावांनी पराभूत केले.

नेमकं काय घडलं?

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या डावात पंजाबकडून पहिले षटक टाकण्यासाठी फिरकीपटू हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) आला होता. हरप्रीतने आपल्या षटकातील फक्त 3 चेंडू टाकले होती, तेव्हाच स्ट्राईकवर असलेला बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने रनअप घेतलेल्या हरप्रीतला हात दाखवत थांबवले.

काही वेळ कोणालाच काही समजले नाही की, डू प्लेसिसने असे का केले? तेव्हाच स्क्रीनवर काळ्या मांजरीला दाखवण्यात आले. ही मांजर साईट स्क्रीनवर आरामात बसली होती. त्यानंतर काही वेळात ती तिथून निघून गेली.

दोन दिवसांपूर्वी असेच काहीचे घडल ज्यामुळे सामन्यात व्यत्यय आला.

साईट स्क्रीन म्हणजे काय?

साईट स्क्रीन गोलंदाज आणि पंचांच्या मागे एका भिंतीप्रमाणे असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ही स्क्रीन काळ्या रंगाची असते. तसेच, कसोटी सामन्यात या साईट स्क्रीनचा रंग पांढरा असतो. ही स्क्रीन फलंदाजांना चेंडूवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करण्यासाठी असते. या भागात प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा तिथे फिरण्यासाठी परवानगी नसते.

हेही वाचा: VIDEO: पाटीदारचा चेंडू थेट वृद्धाच्या डोक्यात; कोहलीला 'काका'ची चिंता

चेन्नई मुंबईच्या सामन्यात नेमकं काय घडलं?

'नाणेफेक होण्यापूर्वी शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे व्यवस्थेत थोडा बिघाड झाला. यामुळेच नाणेफेकीला विलंब झाला. फ्लडलाईटला पुरेसा वीजपुरवठा होत नव्हता. याचबरोबर ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनवरही परिणाम झाला.

शॉर्ट सर्किटमुळे चेन्नईच्या डावातील पहिल्या 10 बॉलपर्यंत डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Black Cat Sitting On Sight Screen At Brabourne Stadium Rcb Vs Pbks Ipl Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLRCBIPL 2022 auction
go to top