FIFA World Cup: पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या, पण स्पेनला नडलाय ४० वर्षीय पठ्ठ्या! कोण आहे वोझिन्हा?

40-Year-Old Vozinha Stuns Spain: पहिल्याच फिफा वर्ल्ड कप सामन्यात स्पेनला ०-० बरोबरीत रोखत केप वर्देसाठी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी स्पेनच्या २७ प्रयत्नांनाही गोल न होऊ देता भक्कम बचाव केला. यात ४० वर्षीय गोलकिपर मोलाचा वाटा उचलला.
40-Year-Old Vozinha Stuns Spain | FIFA World Cup 2026

40-Year-Old Vozinha Stuns Spain | FIFA World Cup 2026

Sakal

Updated on

पेद्री, गावी, फेरान टोरेस आणि यामाल यांसारख्या खेळाडूंना रोखणे हे कोणत्याही गोलकीपरसाठी एक आव्हानात्मक कामच आणि तेही वयाच्या ४० व्या वर्षी आणि देशाच्या पहिल्या फिफा वर्ल्ड कप सामन्यात करणं आणखीनच कठीण. पण ही किमया करून दाखवलीय केप वर्देच्या वोझिन्हाने.

सोमवारी (१५ जून) फिफा वर्ल्ड कपमधील (FIFA World Cup) पदार्पणाच्या सामन्यात केप वर्देने स्पेनसारख्या (Cape Verde) बलाढ्य संघाला ०-० असं बरोबरीत रोखलं. तेव्हा हा व्हेझिन्हा (Vozinha) गोलपोस्टसमोर आनंदाश्रू ढाळताना दिसला होता.

40-Year-Old Vozinha Stuns Spain | FIFA World Cup 2026
Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com