Cheteshwar Pujara | पुजाराचं IPL सोडून काऊंटी खेळणं भारताच्या पथ्यावर

Cheteshwar Pujara Half Century In 5th Test Against England
Cheteshwar Pujara Half Century In 5th Test Against EnglandESAKAL

IND vs ENG 5th Test Day 3 : भारताने आपल्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 125 धावा केल्या. चतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) संयमी अर्धशतकी खेळी करून अँकर इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याला साथ देण्यासाठी आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक खेळ करत संघाचे शतक धावफलकावर लावले.

चेतेश्वर पुजारा ज्यावेळी भारतात आयपीएल सुरू होती त्यावेळी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट (County Cricket) खेळण्यासाठी गेला होता. यादरम्यान, त्याने इंग्लंडमध्ये (England) धावांचा पाऊस पाडला. याचाच फायदा त्याला इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटीसाठी झाला. त्याने संघात पुनरागमन केले याचबरोबर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून अजून आपण भारतासाठी योगदान देऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले.

मात्र तिसऱ्या दिवशी विराट कोहली(20), हनुमा विहारी (11) आणि शुभमन गिल (4) यांनी निराशा केली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Cheteshwar Pujara Half Century In 5th Test Against England
IND vs ENG Day 3 : पुजाराचे संयमी अर्धशतक; पंतचा आक्रमक अवतार

पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतलेल्या भारताने दुसऱ्या डावात खराब सुरूवात केली. सलामीवीर शुभमन गिल (4) स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टुअर्ट ब्रॉडने हनुमा विहारीला 11 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

यानंतर पुजारा आणि विराट कोहली यांनी डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताची आघारी 200 पार पोहचवली. मात्र बेन स्टोक्सने 20 धावांवर खेळणाऱ्या विराट कोहलीला बाद करत ही जोडी फोडली.

कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने भारताला शंभरी पार करून दिली. ऋषभ पंतने पहिल्या डावातील आक्रमक अंदाज दुसऱ्या डावातही कायम ठेवला. या दोघांनी भारताची आघाडी 250 च्या पार नेली. दरम्यान, पुजाराने आपले अर्धशतक 139 चेंडूत पूर्ण केले. पुजाराच्या अर्धशतकाबरोबरच सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने दिवसअखेर 3 बाद 125 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 50 तर ऋषभ पंत 30 धावा करून नाबाद होते. भारताकडे आता 257 धावांची आघाडी आहे.

Cheteshwar Pujara Half Century In 5th Test Against England
विराटमुळे जॉनी बेयरस्टो 'पुजाराचां पंत' झाला; सेहवाग ट्विट व्हायरल

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. मोहम्मद सिराजच्या चार आणि कर्णधार जसप्रीत बुमराहच्या तीन विकेट्समुळे भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 284 धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 106 धावा केल्या.

एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लिश फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. इंग्लंडने पहिल्या सत्रात 18.3 षटकात 116 धावा केल्या. यादरम्यान त्याने कर्णधार बेन स्टोक्सची एकमेव विकेट गमावली, ज्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 4 विकेट गमावल्या. त्या दरम्यान बेअरस्टोनेही शतक केले. तो 106 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टुअर्ट ब्रॉड 1 धावा काढून बाद झाला. सॅम बिलिंग्ज ३६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला. भारताने132 धावांची आघाडी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com