CWG 2022 Day 9 Live : आज कुस्तीत सुवर्ण हॅट्ट्रिक; नवीनने पाकच्या कुस्तीपटूला लाळवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games 2022 Birmingham Day 9 Live

CWG 2022 Day 9 Live : आज कुस्तीत सुवर्ण हॅट्ट्रिक; हॉकीतही पदक निश्चित

Commonwealth Games 2022 Birmingham Day 9 Live Updates: भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आतापर्यंत 29 पदके जिंकली आहेत. यामध्ये नऊ सुवर्ण, अकरा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे. आठव्या दिवशी प्रियांकाने महिलांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. त्याने 43.38 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. लॉन बॉल्स सांघिक प्रकारात भारतीय पुरूष संघाने रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला. लॉन बॉल्स पुरूष सांघिकची फायनल नॉर्दन आयर्लंड आणि भारत यांच्यात झाली. नॉर्दन आयर्लंडने भारताचा 18 - 5 ने पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.

भारताची पदकसंख्या : 34

  • 12 सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन

  • 11 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ

  • 12 कांस्य : गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा सिहग, दीपक नेहरा

भारतीय हॉकी संघाचे रौप्य पदक निश्चित

भारतीय पुरूष हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3 -2 असा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे.

दीपक नेहराने पाकिस्तानच्या तयब रझावर विजय मिळवत जिंकले कांस्य

कुस्तीपटू दीपक नेहराने पाकिस्तानच्या तयब रझावर 10 - 2 असा पराभव करत 97 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.

कुस्तीत अजून एक कांस्य

कुस्तीत भारताने अजून एक कांस्य पदक पटकावले. भारताच्या पूजा सिहागने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी ब्रुनेचा 11 - 0 असा पराभव करत कांस्य पदक पटकावले.

नवीनने पाकिस्तानच्या ताहीरचा पराभव करत जिंकले सुवर्ण 

भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या नवीनने पाकिस्तानच्या मोहम्मद ताहीरचा 9 - 0 असा पारभव करत 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

कुस्ती : दोन सुवर्ण एक कांस्य

भारताने कुस्तीत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले. रवी कुमार दहियाने आणि विनेश फोगाटने सुवर्ण पदक जिंकत भारताची सुवर्ण संख्या दुहेरी आकड्यात पोहचवली. तर पूजा गेहलोतने कांस्य पदक पटकावले.

बॉक्सर जास्मिनला कांस्य पदकावर मानावे लागले समाधान

बॉक्सर 56 ते 60 किलो वजनी गटाताच्या सेमी फायनलमध्ये भारताची जास्मिन इंग्लंडच्या गेमा रिचर्डसन कडून 3 - 2 अशी पराभूत झाली. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

बॉक्सर निखत झरीन पोहचली फायलनमध्ये

निखत झरीनने लाईट वेट (50 Kg) महिला बॉक्सिंगच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या सावन्नाह अलफिया स्टब्लेचा 5 - 0 असा सहज पराभव करत फायनल गाठली. निखतने रौप्य पदक जरी फिक्स केले असले तरी विल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या या गुणी बॉक्सरकडू सुवर्णाचाची अपेक्षा आहे.

लॉन बॉल्समध्ये पुरूषाने जिंकले रौप्य पदक

लॉन बॉल्स सांघिक (4) प्रकारात भारतीय पुरूष संघाने रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला. यापूर्वी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांनी लॉन बॉल्समधील पहिले वहिले सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला होता. त्यानंतर आता....! संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीम इंडियाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा केला पराभव, पदक केले निश्चित

Commonwealth Games 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्यांनी यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यात भारतीय संघाने फायनल गाठून इतिहास रचला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Table Tennis CWG 2022 : श्रीजा अकुलाचा उपांत्य फेरीत पराभव

टेबल टेनिसमध्ये भारताची श्रीजा अकुला उपांत्य फेरीत पराभूत झाली आहे. श्रीजाचा सिंगापूरच्या फॅंग ​​तियानवेईने पराभव केला. आता श्रीजा कांस्यपदकासाठी खेळेल.

Badminton : सिंधू उपांत्य फेरीत

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने मलेशियाच्या जिन वेई गोहचा 19-21, 21-14, 21-18 असा पराभव केला. सिंधूसाठी हा सामना खडतर होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेई गोह तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूला पुनरागमन करणे कठीण जाईल असे वाटत होते, परंतु तिने आपली ताकद दाखवत पुढील दोन गेममध्ये मलेशियाचा पराभव केला.

CWG 2022 : भारताच्या कुस्तीमध्ये आणखी सहा पदकांची अपेक्षा

भारताचे सहा कुस्तीपटू पदकाच्या शर्यतीत आहेत. रवी दहिया, नवीन आणि विनेश फोगट यांच्याकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. त्याचवेळी पूजा गेहलोत, पूजा सिहाग आणि दीपक नेहरा कांस्यपदकासाठी सामने खेळतील.

CWG 2022 : भारतीय कुस्तीपटू रवी दहिया अंतिम फेरीत

रवी कुमार दहियाने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानी कुस्तीपटू अली असदचा पराभव केला. रवीने हा सामना 14-4 असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.

CWG 2022 : भारतीय कुस्तीपटू नवीन अंतिम फेरीत

भारतीय कुस्तीपटू नवीन फ्रीस्टाइल 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने उपांत्य फेरीत इंग्लंडच्या चार्ली बॉलिंगचा 12-1 असा पराभव केला. नवीनने स्वत:साठी पदक निश्चित केले आहे.

अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये जिंकले रौप्यपदक

अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने 8.11.20 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 Boxing : अमित पंघाल बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत

बॉक्सिंगमधील पुरुषांच्या 48-51 किलो गटात अमित पंघलने झांबियाच्या पॅट्रिकचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. त्याने किमान रौप्य पदक निश्चित केले आहे.

Wrestling : नवीननेही कुस्तीत उपांत्य फेरी गाठली

कुस्तीमध्ये नवीनने उपांत्य फेरीतही मजल मारली आहे. त्याने पुरुषांच्या 74 किलो गटात सिंगापूरच्या हाँग यूचा 10-0 असा पराभव केला.

Wrestling : पूजा सिहागने कुस्तीमध्ये उपांत्य फेरी गाठली

महिलांच्या 76 किलो वजनी गटात पूजा सिहागने न्यूझीलंडच्या मिशेल माँटेग्यूचा 5-3 असा पराभव केला. या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

CWG 2022: अभिमानास्पद! चालण्याच्या स्पर्धेत प्रियांका गोस्वामीने जिंकले रौप्य पदक

प्रियंका गोस्वामीने या विजयासह इतिहास रचला आहे. चालण्याच्या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Table Tennis CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये शरथ कमल जिंकला

टेबल टेनिस पुरुष एकेरीत शरथ कमलने सिंगापूरच्या यंग इसाकवर 4-0 असा विजय मिळवला. त्याने हा सामना 11-6, 11-7, 11-4, 11-7 असा जिंकला. यासह शरथने उपांत्य फेरी गाठली आहे.

Wrestling Live: नवीनही कुस्तीत विजयी

पुरुषांच्या कुस्तीमध्ये नवीनने 74 किलो वजनी गटात सिंगापूरच्या हाँग यूचा 13-3 अशा फरकाने पराभव केला. यासह त्याने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

IND vs ENG Live: भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ग्रुप अ मधील आपले तीन पैकी दोन सामने जिंकून सेमी फायनल गाठली आहे. मॅचच्या अपडेट साठी येथे क्लिक करा

Wrestling : विनेशने कुस्तीत अवघ्या 26 सेकंदात विजय

महिलांच्या कुस्तीमध्ये 53 किलो वजनी गटात विनेश फोगटने अवघ्या 26 सेकंदात आपला सामना जिंकला.

Boxing : नीतू बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत

महिलांच्या 48 किलो वजनी गटात नीतूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाच्या प्रियांका ढिल्लॉनचा 5-0 असा पराभव केला. त्यानंतर पंचांनी सामना थांबवला आणि नीतूला विजयी घोषित करण्यात आले. हा सामना जिंकून त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली असून किमान रौप्य पदक निश्चित केले आहे.

Wrestling : पूजा गेहलोतने कुस्ती जिंकली

पूजा गेहलोतने कुस्तीतील पहिला सामना जिंकला आहे. महिलांच्या 50 किलो गटात तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टलीचा 12-2 असा पराभव केला.

Boxing : बॉक्सिंगमध्ये नीतूची लढत सुरू

महिलांच्या 48 किलो वजनी गटात नीतू सौरूशी स्पर्धा झाली आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना कॅनडाच्या प्रियांका ढिल्लनशी होणार आहे. तिने आपले पदक आधीच निश्चित केले असून हा सामना जिंकून ती अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. जर तिने हा सामना जिंकला तर ती किमान रौप्य पदक निश्चित करेल.

Table Tennis : श्रीजा अकुला आणि टेनिसन उपांत्यपूर्व फेरीत

टेबल टेनिसच्या महिला दुहेरीत श्रीजा अकुला आणि टेनिसन या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने वेल्सच्या थॉमस आणि लारा यांचा 11-7, 11-4, 11-3 असा पराभव केला.

Table Tennis : मनिका आणि दिया उपांत्यपूर्व फेरीत

टेबल टेनिसच्या महिला दुहेरीत मनिका आणि दिया या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने मॉरिशसच्या होस्नाली आणि झालिम यांचा 11-5, 11-5, 11-3 असा पराभव केला.

Table Tennis CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये दोन सामने सुरू होतात

टेबल टेनिसच्या महिला दुहेरीत भारताचे दोन सामने सुरू झाले आहेत. मनिका बत्रा आणि दिव्याची जोडी मॉरिशसच्या जोडीशी भिडणार आहे. त्याच वेळी, श्रीजा अकुला आणि रीथ ऋष्य ही जोडी वेल्सच्या संघाशी स्पर्धा करेल.

CWG 2022 : कुस्तीपटूंच्या नावावर आठव्या दिवशी 6 पदक; भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 26

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या आठव्या दिवशी भारताने पदकांचा पाऊस पडला. आठव्या दिवशी कुस्तीला सुरुवात झाली. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनियाने सुवर्ण पदक जिंकले. तर पदार्पण करणाऱ्या अंशू मलिकने रौप्य तर दिव्या काकरानने कांस्य पदक पटकावले. भारताने तापर्यंत....! संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : महिला क्रिकेट संघ इतिहास रचण्यापासून एक विजय दूर

पाकिस्तान आणि बर्बाडोस यांच्याविरुद्ध दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचा आज बलाढ्य इंग्लंडबरोबर राष्ट्रकुल महिला ट्वेन्टी-20 स्पर्धेत उपांत्य फेरीत सामना होत आहे. ही लढाई हरमनप्रीत कौर संघासाठी सोपी नसेल. गेल्या दोन सामन्यांतील सातत्य ठेवण्याचे आव्हान असेल. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG22: हॉकीमध्ये भारतीय महिलांवर झाला अन्याय? सेहवागने केली अंपायरवर टीका

भारतीय महिला हॉकी संघाला शुक्रवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या महिला हॉकीच्या सेमीफायनल सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 Live: भारतासाठी आठवा दिवस कसा होता

कॉमनवेल्थ 2022 चा आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंच्या नावावर राहिला. या दिवशी भारतातील सहा कुस्तीपटू मॅटवर उतरले आणि सर्वांनी पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. भावीनाने पॅरा टेबल टेनिसच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला असून पदक निश्चित केले आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा 8 वा दिवस भारतासाठी कसा गेला हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: Commonwealth Games 2022 Birmingham Day 9 Live Wrestling Athletics Lawn Bowls Updates Cwg News 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :wrestlingsports