Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

Commonwealth Games 2026 India full squad list: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारताचा १२५ सदस्यीय खेळाडूंचा संघ सज्ज झाला आहे. या ताफ्यात ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडूंचा समावेश असून, ते १३ विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Commonwealth Games 2026 India full squad list

Commonwealth Games 2026 India full squad list

esakal

Updated on

Commonwealth Games 2026 schedule and live streaming: २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी १२५ खेळाडू सज्ज झाले आहेत. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडू १३ क्रीडा प्रकारांत (पॅरा-स्पोर्ट्ससह) आपला सहभाग नोंदवणार आहेत. ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक ३२ खेळाडू (२२ पुरुष आणि १० महिला) देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यानंतर बॉक्सिंग ( १४), ज्युदो ( १४) व वेटलिफ्टिंग ( १२) या खेळांत सर्वाधिक खेळाडू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com