ENG vs BAN : इंग्लिश गोलंदाजांनी इंग्लंडचा पेपर केला सोपा!

बांगलादेशचा डाव निर्धारित 20 षटकात 124 धावांपर्यंत मजल मारु शकला.
England vs Bangladesh
England vs BangladeshT 20 World Cup Twitter
Summary

स्पर्धेतील आपली आशा पल्लवित ठेवण्यासाठी बांगलादेशसाठी हा सामना जिंकणं महत्त्वपूर्ण होते. पण...

England vs Bangladesh, 20th Match, Super 12 Group 1 : मोईन अलीच्या फिरकीने सुरुवातीला घेतलेल्या गिरकीनंतर लायम लिविंगस्टोन आणि मिल्सनं केलेला माऱ्यासमोर बांगलादेशच्या फंलदाजी अक्षरश: कोलमडली. मुशफिकुर रहिमच्या 29 धावा वगळता अन्य एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी बांगलादेशचा डाव निर्धारित 20 षटकात 124 धावांपर्यंत मजल मारु शकला.

ग्रुप 1 मध्ये बांगलादेशला यापूर्वी सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतील आपली आशा पल्लवित ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण होता. पण दुबईच्या मैदानात मोठी धावंसख्या उभारणं त्यांना जमलेल नाही. बांगलादेशन टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय फोल ठरला.

England vs Bangladesh
शोएब अख्तर म्हणाला, पाकिस्तान हा सुरक्षित देश, पण...

ग्रुप 1 मध्ये इंग्लंडने पहिल्या सामन्यात दोन वेळच्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. दुसरीकडे बांगलादेशला सलामीच्या लढतीत श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. माफक धावा करुन इंग्लंडने बाजी मारली तर त्यांचे या गटातून सेमीफायनलसाठीची गणित आणखी सोपी होतील.

बांगलादेशकडून पाच जणांनीच पार केला दुहेरी आकडा

संघाला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी मुशफिकुरने उत्तम प्रयत्न केला. त्याने मैदानात तग धरून 30 चेंडू खेळत 3 चौकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार महमदुल्लाहने 19 , नुरुल हसन 16 , मेहंदी हसन 11 आणि नसुम अहमद19 धावांची खेळी केली. ही पाच जण वगळता अन्य एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. गेल्या काही सामन्यात सलामीवीर नईमने उत्तम कामगिरी केली होती. पण मोईन अलीने त्याला अवघ्या 5 धावांवर माघारी धाडले. स्पर्धेत संघर्ष करणाऱ्या लिटन दासलाही मोईन अलीने 9 धावांवर माघारी धाडले. या दोन विकेट्सनंतर बांगलादेशच्या संघाला सावरता आले नाही. ठरविक अंतराने त्यांच्या विकेट पडत राहिल्या.

England vs Bangladesh
मी तुझ्या घरातला TV फोडला होता? भज्जीनं घेतली अमीरची फिरकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com