Rohit Sharma Ind vs Pak : मॅचच्या मधीच रोहित शर्माचा 'तो' मेसेज ठरला गेम चेंजर, सामना संपल्यानंतर कर्णधाराने स्वतः केला खुलासा

India beat Pakistan T20 World Cup : दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यातील विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
Rohit Sharma Statement After India beat Pakistan
Rohit Sharma Statement After India beat Pakistansakal

Rohit Sharma Statement After India beat Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये एक हाय व्होल्टेज सामना खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली. टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकला. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यातील विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

Rohit Sharma Statement After India beat Pakistan
Jasprit Bumrah Ind vs Pak : 24 चेंडू… 15 डॉट्स… 3 विकेट… बूम बूम बुमराहने फिरवले टेबल अन् भारताने केला मोठा विक्रम

काय म्हणाला रोहित शर्मा?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर म्हणाला की, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. मला वाटले की आम्ही 10 षटकांनंतर चांगल्या स्थितीत आहोत, नंतर आम्ही 15-20 धावांनी मागे राहिलो. पण तरीही गोलंदाजांनी त्यांचे काम केले.

खेळपट्टीबाबत तो पुढे म्हणाला की, ही विकेट आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या विकेटपेक्षा चांगली होती. जेव्हा फलंदाजी करताना पाकिस्तानचा अर्ध्या डाव संपला, तेव्हा आम्ही सर्व खेळाडूंना बोलावले आणि म्हणाले की जर हे आपल्या बाबतीत घडू शकते तर ते त्यांच्यासोबत देखील होऊ शकते.

Rohit Sharma Statement After India beat Pakistan
T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेला सलग तिसऱ्या विजयाची आस! पहिल्यांदाच प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी बांगलादेश सज्ज

बुमराहबाबत मोठे वक्तव्य

रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल सांगितले की, जसप्रीत बुमराह चांगली कामगिरी केली. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. त्याने या वर्ल्ड कपच्या शेवटपर्यंत त्याच मानसिकतेत राहावे अशी आमची इच्छा आहे, तो चेंडूत हुशार आहे.

चाहत्यांबद्दल विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, गर्दी विलक्षण होती, त्यांनी कधीही निराश केले नाही, आम्ही जगात कुठेही खेळलो तर चाहते मोठ्या संख्येने येतात. आणि आम्हाला साथ देतात. ही फक्त स्पर्धेची सुरुवात आहे, आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com