Vaibhav Suryavanshi Records: १५ वर्षीय वैभवने IPL मध्ये इतिहास घडवला! असा पराक्रम, जो जगात आतापर्यंत कुणालाच नव्हता जमला...

Vaibhav Suryavanshi Sets Unbelievable Record at Just 15: वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये अविश्वसनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी त्याने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी जगातील कोणत्याही खेळाडूला जमला नव्हता.या सामन्यातील आपल्या खेळी दरम्यान त्याने रिषभ पंत आणि इशान किशन यांच्या नावावर ८ वर्षांपासून असलेला विक्रम मोडला.
Vaibhav Sooryavanshi Breaks Pant, Kishan's Historic Record; Becomes First Player In World With Incredible Feat.jpg

Vaibhav Sooryavanshi Breaks Pant, Kishan's Historic Record; Becomes First Player In World With Incredible Feat 

esakal

Updated on

15 year old cricketer Vaibhav Sooryavanshi incredible feat IPL: वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात १५ वर्षीय वैभवने जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्याचा निर्भयपणा पाहून सारेच अवाक् झाले. आयपीएलमध्ये वैभव जेव्हा पहिल्यांदा मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता, तेव्हा त्याला धावांचे खातेही उघडता आले नव्हते. पण, आज त्याने ११-११ षटकांच्या सामन्यात १४ चेंडूत ३९ धावांची वादळी खेळी केली, त्यात १ चौकार व ५ खणखणीत षटकारांचा समावेश होता. यशस्वी जैस्वालसह त्याने राजस्थान रॉयल्ससाठी ३० चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com