
दक्षिण आफ्रिका संघाने काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या विजेतेपदानंतर दक्षिण आफ्रिकेने अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली असून नव्या चेहऱ्यांना झिम्बाव्वे विरूद्धच्या कसोटी मालिकेत संधी दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या उगवत्या तारेही या संधीचं सोनं करताना दिसत असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे भविष्य सुरक्षित असल्याची ग्वाहीही देत आहेत. नुकतेच १९ वर्षांच्या लुआन-ड्रे प्रिटोरियसने खणखणीत दीडशतक ठोकले आहे.
शनिवारपासून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेकडून कोडी युसूफ, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस यांचे कसोटी पदार्पण झाले.