Abhishek Sharma has been discharged from the hospital today.
esakal
Cricket
Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?
What happened to Abhishek Sharma in Mumbai? भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत बिघडल्याने त्याला सलाईन (ड्रिप्स) देण्यात आल्या आणि डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवले. काही प्रमाणात वजन घटल्याचीही माहिती समोर आली आहे.
Will Abhishek Sharma play next match after hospital discharge? भारताचा प्रमुख फलंदाज अभिषेक शर्मा याला दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या सलामीच्या लढतीत वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला अभिषेक पूर्ण जोशात होता. त्याने नेट्समध्ये चांगली फलंदाजी केली होती. पण, त्याला अपयश आले आणि नवी दिल्लीत पोहोचताच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. २४ वर्षीय हा खेळाडू गुरुवारी अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
