

Abhishek Sharma
Sakal
Abhishek Sharma Unwell: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला दुसरा सामना गुरुवारी (१२ फेब्रुवारी) खेळायचा आहे. मात्र या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समोर आले आहे.
अभिषेक (Abhishek Sharma) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे, मात्र आता त्याला दवाखान्यात दाखल (Hospitalised) करण्यात आल्याने भारतीय संघाची (Team India) चिंता वाढली आहे.