

Abhishek Sharma | Ravindra Jadeja | ICC Rankings
Sakal
ICC Rankings Update: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतीच ताजी कसोटी आणि टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. ही क्रमवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय संघाला एकाचवेळी आनंदाची आणि एक निराशीची बातमी मिळाली आहे.
भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) पुन्हा एकदा टी२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने भारताच्याच ईशान किशनला (Ishan Kishan) मागे टाकले आहे. मात्र असे असतानाच भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) कसोटी क्रमवारीत तब्बल चार वर्षांनंतर अव्वल क्रमांक गमावला आहे.