BIHAR IPL TEAM DEMAND GROWS AFTER VAIBHAV SURYAVANSHI AND ISHAN KISHAN’S SUCCESS
Demand for Bihar IPL team after Vaibhav Sooryavanshi rise: वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये काय धुमाकूळ घातलाय, हे वेगळं सांगायला नको. १३ सामन्यांत २३६.३२ च्या स्ट्राईक रेटने पठ्ठ्याने ५७९ धावा कुटताना अनेक विक्रम नावावर केले आहेत. त्याचवेळी इशान किशनही ४९० धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप टेनमध्ये आहे. या दोघांमुळे आता आयपीएलमध्ये बिहारची टीम असावी अशी मागणी होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, हे संघ त्या त्या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच बिहार राज्याचे प्रतिनिधित्व करणारा संघ आयपीएलमध्ये असावा अशी इच्छा वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.