लग्नाच्या पुढच्या दिवशीच...! अर्जुन तेंडुलकरला Rishabh Pant चा 'तो' प्रश्न, Video Viral

Arjun Tendulkar - Rishabh Pant Conversation: अर्जुन तेंडुलकर यंदा आयपीएल २०२६ मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. याआधी जेव्हा त्याची रिषभसोबत भेट झाली, तेव्हा त्यांच्यात नेमकं काय संभाषण झालं जाणून घ्या
Arjun Tendulkar - Rishabh Pant Conversation

Arjun Tendulkar - Rishabh Pant Conversation

Sakal

Updated on

अर्जुन तेंडुलकर नुकताच त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. ५ मार्च रोजी त्याने सानिया चंदोक हिच्याशी मुंबईमध्ये लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नासाठी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजही उपस्थित होते. दरम्यान, आता लग्नानंतर तो २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत यंदा तो लखनौ सुपर जायंट्सकडून खेळेल.

तो यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळला आहे. पण मुंबईने त्याला आयपीएल २०२६ आधी (IPL 2026) लखनौ सुपर जायंट्ससोबत (LSG) ट्रेड केले. त्यामुळे आता अर्जुनसाठी (Arjun Tendulkar) लखनौ हा आयपीएलमधील दुसरा संघ असणार आहे. या संघाचा कर्णधार सध्या रिषभ पंत (Rishabh Pant) आहे.

<div class="paragraphs"><p>Arjun Tendulkar - Rishabh Pant Conversation</p></div>
Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com