Abhishek Sharma and Shubman Gill
esakal
आशिया कप २०२५ सुपर ४ मध्ये भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले.
सामन्यापूर्वी हॅरिस रौफने ६-०, ६-० नारेबाजी करत भारतीयांना उचकावले होते.
अभिषेक शर्मा (७४) आणि शुभमन गिल (४७) यांनी ९.५ षटकांत १०५ धावांची सलामी भागीदारी केली.
Viral tweets of Indian cricketers after beating Pakistan in Asia Cup : भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा गाजला... आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने वर्चस्व दाखवताना पाकिस्तानला पुन्हा पराभवाचं पाणी पाजलं. हस्तांदोलन प्रकरणानंतर IND vs PAK पुन्हा समोरासमोर आले आणि यावेळी पाकिस्तानी खेळाडूंचा बालीशपणा दिसला. सामन्यापूर्वी हॅरिस रौफने ६-०, ६-० अशा थापा मारून भारतीयांना डिवचले आणि प्रत्यक्ष सामन्यात रौफने फलंदाज अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांच्याशी पंगा घेतला. त्यात सीमारेषेवरही त्याने वादग्रस्त हावभाव केले. आता रौफच्या या माकडचाळ्यांना भारतीयांनी कामगिरीतून उत्तर दिले.