Abhishek Sharma made history in Asia Cup 2025
esakal
Abhishek Sharma made history in Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दुबळ्या संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजयाची नोंद केली. कुलदीप यादवची प्रभावी फिरकी अन् शिवम दुबेच्या माऱ्यासमोर यूएईचा संघ ५७ धावांवर गडगडला. त्यानंतर अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक खेळ करून ४.३ षटकांत सामना जिंकून दिला. अभिषेकने या सामन्यात १६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार लगावत ३० धावा केल्या, तर शुभमन ९ चेंडूंत २० धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने दोन चेंडूंत नाबाद ७ धावा केल्या.