
Asia Cup History
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
१९८४ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वाधिक ८ वेळा विजेतेपद मिळवले आहे.
२०२५ मध्ये टी२० प्रकारात स्पर्धा होणार असून, २०२६ मध्ये टी२० वर्ल्ड कप होणार आहे.
आशिया क्रिकेट काऊन्सिककडून प्रत्येक दोन वर्षांनी आशिया कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा ९ सप्टेंबर २०२५ पासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरू होणाऱ्या आशिया कपचे हे १७ वे पर्व असणार आहे. आत्तापर्यंत १६ वेळा ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. १९८४ साली पहिल्यांदा आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीला वनडे प्रकारात सामने होत होती.
आत्ता जरी ८ देशात आशिया कप खेळला जाणार असला तरी सुरुवातीला तीन ते चार देशातच ही स्पर्धा होत होती.