

Ayush Mhatre and Vaibhav Suryavanshi’s Emotional Video
Sakal
Ayush Mhatre's Video Crediting Vaibhav Suryavanshi for U19 WC: शुक्रवारी (६ फेब्रुवारी) भारताच्या युवा संघाने इतिहास घडवला. हरारेमध्ये १९ वर्षांखालील इंग्लंड संघाला १०० धावांनी पराभूक करत १९ वर्षांखालील भारतीय संघ संघ विश्वविजेता झाला. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघाने सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर (U19 World Cup) नाव कोरले.
भारताच्या अंतिम सामन्यातील विजयात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा (Vaibhav Suryavanshi) मोठा वाटा राहिला. त्याने पावणेदोनशे धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे अंतिम सामन्यातील सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही तो ठरला.