Babar Azam Afghanistan : तो सगळीकडे आहे... बाबर आझम थेट अफगाणिस्तानचा कर्णधार

Babar Azam : बाबर आझम पुन्हा कर्णधार झालाय... मात्र यावेळी संघ बदलला आहे. पाकिस्तानचा सख्खा शेजारी असलेल्या देशातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
Babar Azam
Babar Azamesakal

Babar Azam Afghanistan Captain : बाबर आझमने भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचे कर्णधारपद सोडलं होतं. त्याने फक्त वनडे नाही तर कसोटी आणि टी 20 मधून देखील नेतृत्वाची धुरा खांद्यावरून खाली ठेवली होती. मात्र त्याला पुन्हा एकदा कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. संघ मात्र अफगाणिस्तानचा आहे.

Babar Azam
BCCI Central Contract List : बीसीसीआयच्या वार्षिक करारात कोणाचं प्रमोशन तर कोणाचं डिमोशन?

थांबा! बाबर आझमनं पाकिस्तान सोडलेलं नाही किंवा तो अफगाणिस्तानचा नागरिक देखील झालेला नाही. अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे प्रक्षेपण करणाऱ्या चॅनलने हा गोंधळ घातला आहे. अबू धाबी येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यावेळी तांत्रिक चूक झाली.

आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबिर्नेचा फोटो आणि अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा फोटो दाखवण्यात आला. आयर्लंडच्या कर्णधाराचा फोटो बरोबर लावण्यात आला. मात्र अफगाणिस्तानच्या कर्णधार हश्मतुल्ला शाहिदीच्या जागी बाबर आझमचा फोटो लावण्यात आला.

Babar Azam
BCCI Annual Contract : अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं! बीसीसीआयनं अय्यर, किशनचा विषयच संपवला?

बाबर आझमला चुकून अफगाणिस्तानचा कर्णधार केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेक नेटकऱ्यांनी त्यावरून चेष्टा करण्यास सुरूवात केली. पाकिस्तानच्या वनडे वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर बाबर आझमने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर कसोटीत शान मसूदने पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com