

India U19 Asia Cup Final defeat reasons: भारताच्या १९ वर्षांखालील संघाला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली. पाकिस्तानच्या ३४७ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी शस्त्र म्यान केली आणि संपूर्ण संघ १५६ धावांत तंबूत परतला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अॅक्शन मोडवर आली आहे आणि या पराभवामागचे स्पष्टीकरण त्यांनी कर्णधार आयुष म्हात्रे व प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांच्याकडे मागितले आहे. या सामन्यात आयुष व वैभव सूर्यवंशी यांनी ज्या प्रकारे खेळ केला आणि नंतर त्यांची वर्तवणूक जी होती, त्यावरही बीसीसीआय कारवाई करू शकते.