
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे नवे विजेते आहेत दक्षिण आफ्रिका. शनिवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानात खेळलेल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
टेम्बा बावूमा हन्सी क्रोनिएनंतर दक्षिण आफ्रिकेला आयसीसी विजेतेपद जिंकून देणारा दुसराच कर्णधार ठरला. मात्र, दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला अपयश आले. यापूर्वी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप कमिन्सच्या नेतृत्वात जिंकली होती.